ETV Bharat / city

आधार कार्ड बनवण्यासाठी किती येतो खर्च? सरकारलाही नाही माहिती..

आता जवळपास सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार ओळखपत्र असणे अपरिहार्य बनले आहे. असे असताना, एक आधार कार्ड बनवण्यासाठी किती खर्च येतो, किंवा आला पाहिजे याबद्दल सरकारकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच, भारतात आणखी किती आधार कार्डांची गरज आहे, ही माहितीही विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे नसल्याचे प्राधिकरणाचे महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही बाब उघड केली आहे.

आधार कार्ड बनवण्यासाठी किती येतो खर्च?
author img

By

Published : Oct 31, 2019, 10:18 AM IST

मुंबई - देशात हजारो कोटी रुपये खर्च करून 'आधार' ओळखपत्र योजना आणली गेली होती. आता तर जवळपास सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार ओळखपत्र असणे अपरिहार्य बनले आहे. असे असताना, एक आधार कार्ड बनवण्यासाठी किती खर्च येतो, किंवा आला पाहिजे याबद्दल सरकारकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही बाब उघड केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली

अनिल गलगली यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून आधारविषयी विविध माहिती मागवली होती. यावेळी, भारतात आणखी किती आधार कार्डांची गरज आहे, ही माहितीही विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे नसल्याचे प्राधिकरणाचे महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले. एकूण आधार कार्ड बनविण्याच्या अंदाजित लक्ष्याबाबत २० सप्टेंबर २०१९ला एक अधिसूचना देण्यात आली होती. यातही एकूण अंदाजित ओळखपत्रांची संख्या नमूद केलेली नाही.

आतापर्यंत एकूण किती आधार कार्ड तयार केले गेले आहेत, या माहितीसाठी केलेला अर्ज हा लॉजिस्टिक्स विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. तर, आधार ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबतचा अर्ज वित्त विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. वित्त विभागाचे सहायक महासंचालक सय्यद रवीश अली यांनी अनिल गलगली यांना स्पष्ट केले की, मागितलेली माहिती वित्त विभागात उपलब्ध नाही. अनिल गलगली यांनी संकेतस्थळाला भेट दिली असता, 124 कोटी 62 लाख 21 हजार 866 कार्ड तयार झाल्याचे आढळले. तथापि प्रत्येक आधार कार्ड बनविण्यासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती उपलब्ध नव्हती.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, आकडेवारीत माहिती देण्याऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रत्यक्षात मागितलेली माहिती आणि उत्तर देण्याचे टाळले आहे. जर माहिती उपलब्ध नसेल तर ती कोठे उपलब्ध आहे यावर प्राधिकरण मौन बाळगून आहे. अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : दंडसंहितेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी सुधारणा

Intro: एका आधार कार्डसाठी येणा-या खर्चाची माहिती सरकारकडे उपलब्धच नाही .माहिती अधिकारात बाब उघड

देशात हजारो कोटी रुपये खर्च करून आधार ओळखपत्र योजना आणली गेली होती, परंतु प्रत्येक आधार कार्ड बनवताना होणा-या खर्चाची माहिती उपलब्ध नाही, अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली.या व्यतिरिक्त, एकूण आवश्यक कार्ड आणि आता किती कार्डे आवश्यक आहेत याबद्दल देखील सरकारकडे माहिती नाहीBody: एका आधार कार्डसाठी येणा-या खर्चाची माहिती सरकारकडे उपलब्धच नाही .माहिती अधिकारात उघड

देशात हजारो कोटी रुपये खर्च करून आधार ओळखपत्र योजना आणली गेली होती, परंतु प्रत्येक आधार कार्ड बनवताना होणा-या खर्चाची माहिती उपलब्ध नाही, अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली.या व्यतिरिक्त, एकूण आवश्यक कार्ड आणि आता किती कार्डे आवश्यक आहेत याबद्दल देखील सरकारकडे माहिती नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाला आधार ओळखपत्राची विविध माहिती मागितली होती. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे सहायक महासंचालक अशोक कुमार यांनी अनिल गलगली यांच्या अर्जावर कळविले की एकूण आवश्यक कार्ड आणि आता आवश्यक असलेल्या कार्डाची माहिती उपलब्ध नाही. एकूण कार्ड बनविण्याच्या अंदाजित लक्ष्याबद्दल 20 सप्टेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेची एक प्रत देण्यात आली, तर या कार्डाच्या एकूण अधिसूचनेत एकूण अंदाजित कार्डांची संख्याही नमूद केलेली नाही. आतापर्यंत एकूण किती कार्ड तयार केले गेले आणि किती कार्ड वितरित केले या माहितीवर, गलगलीचा अर्ज लॉजिस्टिक्स विभागात हस्तांतरित करण्यात आला आहे. तसेच कार्ड तयार करण्यासाठी लागणार्‍या खर्चाबाबत गलगलीचा अर्ज वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आला.

वित्त विभागाचे सहायक महासंचालक सय्यद रवीश अली यांनी अनिल गलगली यांना स्पष्ट केले की, मागितलेली माहिती वित्त विभागात उपलब्ध नाही. अनिल गलगली यांनी संकेतस्थळाला भेट दिली असता, 124 कोटी 62 लाख 21 हजार 866 कार्ड तयार झाल्याचे आढळले. तथापि प्रत्येक आधार कार्ड बनविण्यासाठी येणा-या खर्चाची माहिती उपलब्ध नव्हती.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, आकडेवारीत माहिती देण्याऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रत्यक्षात मागितलेली माहिती आणि उत्तर देण्याचे टाळले आहे. जर माहिती उपलब्ध नसेल तर ती कोठे उपलब्ध आहे यावर मौन बाळगून आहे. अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्वसामान्यांना समजेेल अश्या सोप्या पद्धतीने संपूर्ण प्रकरणाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
Byt.. अनिल गलगली माहिती अधिकार कार्यकर्तेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.