ETV Bharat / city

Eknath Shinde On Rain Situation : अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या राज्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष - मुख्यमंत्री शिंदे

मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला ( Heavy Rains In The State ) सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने कोकणपट्टीत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या ठिकाणी त्याचबरोबर मुंबईत सुद्धा अतिवृष्टीचा धोका असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर येणाऱ्या तीन ते चार दिवसात हा पाऊस सतत कमी जास्त प्रमाणात पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा सकाळपासून घेत आहेत.

EKNATH SHINDE
EKNATH SHINDE
author img

By

Published : Jul 5, 2022, 7:50 PM IST

मुंबई - संपूर्ण राज्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने त्यांनी प्रशासनाने आवश्यक त्या सूचना देऊन ठेवल्या आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी सकाळी सात वाजता राज्याचे मुख्य सचिव मनोक्रमा श्रीवास्तव यांच्याशी याबाबत चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सातारा, कोल्हापूर व मुंबई या भागात अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व पालक सचिवांशी ही त्यांनी चर्चा केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तेथील लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीच्या परिस्थितीवर सरकार, प्रशासनाचे लक्ष

आषाढी पूजेचा मान दिल्याचा आनंद? - पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आषाढी एकादशीला पूजेसाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावर बोलताना यंदा पंढरपूरला एकादशी पूजेचा मान मला व माझ्या कुटुंबीयांना भेटला याचा मला फार आनंद आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन - नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते. याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी.वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे , उपायुक्त यांसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - Gajanan Maharaj Palkhi : वैष्णव पताका हाती घेऊन संत गजानन महाराज पालखी विठ्ठल भेटीला रवाना; सोलापुरात भव्य स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.