ETV Bharat / city

मुंबई : जमावबंदी आदेशाला पहिल्या दिवशी नागरिकातून चांगला प्रतिसाद

author img

By

Published : Mar 29, 2021, 10:10 AM IST

सरकारच्या या आदेशानुसार राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रोज जमावबंदीचा आदेश लागू असेल. मुंबईत 28 मार्च हा नाईट कर्फ्यूचा पहिला दिवस असल्यामुळे गिरगांव चौपाटीवर रोजच्यासारखी गर्दी नव्हती. दरवर्षी होळीच्या दिवशी मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, रविवारी संध्याकाळी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी नव्हती. नागरिकांकडून जमाव बंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्र

मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढली तर आगामी काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारने रविवारपासून (28 मार्च) संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. सरकारच्या या आदेशानुसार राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रोज जमावबंदीचा आदेश लागू असेल.

राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रोज जमावबंदीचा आदेश लागू

जमावबंदीचा पहिला दिवस असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत या आदेशाचे पालन केले गेले. सर्व जिल्ह्यातील पोलीस आणि इतर यंत्रणा जमावबंदीच्या आदेशाचा अवलंब करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. मुंबईत 28 मार्च हा नाईट कर्फ्यूचा पहिला दिवस असल्यामुळे गिरगांव चौपाटीवर रोजच्यासारखी गर्दी नव्हती. दरवर्षी होळीच्या दिवशी मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, रविवारी संध्याकाळी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी नव्हती. 28 मार्चच्या रात्री आठ वाजेपासून नाईट कर्फ्यूला सुरुवात झाल्यामुळे येथे गर्दी नव्हती. तसेच मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेने संध्याकाळी गिरगांव चौपाटीवरील नागरिकांना घरी जायला सांगित्यामुळेसुद्धा येथे नागरिक नव्हते.

राज्य शासनाच्या जमावबंदीच्या आदेशानुसार ठाण्यात प्रशासनाकडून हालचाली करण्यात आल्या. 28 मार्च रोजी रात्रीचे आठ वाजेपासून ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी दुकाने बंद करण्यात आली होती. तसेच रात्री आठच्यानंतर येथील गर्दीसुद्धा ओसरली होती. ठाण्यात अटी आणि नियम न पाळल्यास पोलीस दलाकडून कारवाई करण्यात येत असल्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून जमावबंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.