ETV Bharat / city

Dahi Handi 2022 गोविंदा आला रे, महाराष्ट्रात दहीहंडीचा जाणून घ्या इतिहास - Dahihandi festival in India

श्रावणात येणारा एक महत्वाचा उत्सव म्हणजे गोपाळकाला अर्थात दहीहंडी.Dahi Handi 2022 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या Shri Krishna Janmashtami 2022 दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. तर या दहीहंडीच्यावेळी तरुण मुले संघ तयार करून त्यात सहभागी होतात. आणि उंचावर दह्याने भरलेली हंडी लावले जाते. ही हंडी फोडण्याचा प्रयत्न तरुणांची विविध मंडळे करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते. मात्र या सणामागची Dahi Handi festival पार्श्वभूमी नेमकी काय हे जाणून घेऊयात.

Dahi Handi Celebration
दहीहंडी
author img

By

Published : Aug 19, 2022, 10:30 AM IST

मुंबई श्रावण महिना सुरु आहे आणि एकामागोमाग सणांची जणू रांगच लागली आहे. याच श्रावणात येणारा आणखी एक महत्वाचा उत्सव म्हणजेच गोपाळकाला अर्थात दहीहंडी. Dahi Handi 2022 दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या Shri Krishna Janmashtami 2022 दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी दहीहंडी उत्सव Dahi Handi festival मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. मात्र या सणामागची पार्श्वभूमी नेमकी काय हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

भारताच्या विविध प्रांतातही साजरी केली जाते दहीहंडी हा उत्सव भारतात Dahihandi festival in India सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजरातमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. गोकुळ, वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारकादी क्षेत्रांत, कृष्णजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. वृंदावन येथे या निमित्ताने दोलोत्सव होतो.

महाराष्ट्रातील दहीहंडी फोडण्याची प्रथा कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो आणि त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषत मुंबईत, उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण आणि आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला आणि सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची आणि मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात आणि बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमलेली असते.

जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू आणि आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत आणि वाटून खात असत असे मानले जाते.

हेही वाचा World Photography Day 2022 जागतिक छायाचित्रण दिनाचा काय आहे इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.