ETV Bharat / city

जाचक अटींतून दिलासा देण्याची गणेश मंडळांची मागणी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी काही अटींमध्ये सवलतींची मागणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ मार्ग काढून दिलासा द्यावा असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे.

जाचक अटींतून दिलासा देण्याची गणेश मंडळांची मागणी
जाचक अटींतून दिलासा देण्याची गणेश मंडळांची मागणी
author img

By

Published : Aug 11, 2021, 3:42 PM IST

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी काही अटींमध्ये सवलतींची मागणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. मात्र मंडपासाठी ऑनलाइन-ऑफलाईन परवानगी, ध्वनिक्षेपकांचा आवाज, मूर्तीची उंची यासंदर्भतील जाचक अटींचा सामना मंडळांना करावा लागतो असे सांगतानाच महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ मार्ग काढून दिलासा द्यावा असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे.

जाचक अटींतून दिलासा देण्याची गणेश मंडळांची मागणी

नांगरे-पाटील यांचे आवाहन

मुंबईतील गणेशोत्सव मंडळ समितीने महापालिका आणि पोलीस प्रशासनासोबत एक बैठक घेत या मागण्या केल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सांगितले. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिल्याचेही ते म्हणाले. यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करावा. आवाजाची, गणेश उंचीची मर्यादा पाळावी अशा नांगरे-पाटील यांनी यावेळी केल्या. या बैठकीला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार संघ इत्यादी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंडळांनी केल्या या मागण्या

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करतील. परंतु, आवाज मर्यादित राखण्याच्या अटी-शर्तींमध्ये राज्य आणि पोलिसांच्या नियमांत विसंगती आहे. मूर्तीची उंची ८ फूट केली आहे. गणेश वाहन, विविध स्वरूपाची सजावट पकडल्यास कायद्याचा भंग होतो. यावर प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास मनाई आहे. वर्षभर मंडळे विविध उपक्रम राबवत असतात, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शासनाकडून केल्या जाणाऱ्या मदतीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. सध्या कोविडमुळे मंडळांची स्थिती बिकट आहे. त्यामुळे ही अट शिथील करण्याबाबत राज्य शासनाने विचार करावा. गणेशोत्सवाला अवधी कमी शिल्लक आहे. त्यामुळे मंडप उभारणीसाठी मंडळांची धावपळ उडाली असून परवानगीसाठी सुरू केलेले ऑनलाईन-ऑफलाईन मार्ग शासकीय कामकाजाच्या दिवसांव्यतिरिक्तही शनिवारी-रविवारी खुले ठेवावेत. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांवर ध्वनिक्षेपकाच्या संदर्भात गुन्हे दाखल आहेत, ते मागे घेण्यात यावेत. गणेश मूर्ती विसर्जनासाठी लसींच्या दोन डोसचा निर्णय लागू करावा, अशी मागणी नरेश दहीबावकर यांनी केली.

हेही वाचा - पुण्यातील गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली, पाहा काय आहेत नवीन नियम?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.