ETV Bharat / city

वाशीत गॅसची पाईप लाईन फुटल्याने तारांबळ

author img

By

Published : Dec 31, 2020, 6:48 PM IST

वाशी सेक्टर ९ मध्ये जैन मंदिरासमोर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गटार बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाचे खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी असलेल्या महानगर गॅस घरघुती पुरवठा करणाऱ्या गॅस लाईनला जेसीबीचा फटका लागला.

गॅस पाईप लाईन
गॅस पाईप लाईन

नवी मुंबई - वाशी सेक्टर ९ मधील जैन मंदिरासमोर गटाराचे खोदकाम सुरू असताना महानगर गॅसची पाईप लाईन फुटली. त्यामुळे वाशी परिसरात गॅसच्या वासाने नागरिक भयभीत झाले होते. मात्र वाशी अग्निशमन दल आणि महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी वेळीच या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या गॅस गळतीने अर्धा तास वाशीचा घरगुती गॅस पुरवठा खंडित झाला होता.

पी व्ही जाधव

वाशी सेक्टर ९ मध्ये जैन मंदिरासमोर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गटार बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाचे खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी असलेल्या महानगर गॅस घरघुती पुरवठा करणाऱ्या गॅस लाईनला जेसीबीचा फटका लागला. त्यानंतर गुरूवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा पाईप लाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड प्रवाहाने गॅस गळती झाली.

महानगर गॅसतर्फे पाईप लाईनने होणारा पुरवठा बंद करण्यात आला-

या ठिकाणी समोरच असलेल्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गॅस व पाण्याचा प्रवाह सुरु ठेवला. त्यानंतर महानगर गॅस तर्फे पाईप लाईनचा पुरवठा बंद करण्यात आला. गॅस लीक होत असल्याने वाशी विभागात सर्वत्र वास येत होता. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर बाहेर पडले होते.

वाहतूक दुसरी कडे वळवली-

यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून वाशी वाहतूक पोलीस आणि वाशी पोलिसांनी त्याठिकाणची संपूर्ण वाहतूक दुसरीकडे वळवली. जवळ पास एक तास सतत पाण्याचा प्रवाह या गॅस गळती वर अग्निशमन दलाने सुरू ठेवला होता. गॅस पाईप लाईनला सुमारे चार ते पाच तास दुरुस्तीला लागले असल्याने घरघुती गॅस व अवलंबून असणारे अर्ध्या वाशीतील नागरिक प्रभावित झाले. गॅस लाईन चा पुरवठा खंडित केल्यानंतर एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही गॅस गळती थांबली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा- हिंदुहृदयसम्राट ऐवजी 'जनाब' बाळासाहेब ठाकरे; भाजपाचा सेनेवर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.