मुंबई - राज्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे काँग्रेस’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. आगामी तीन महिने चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत राज्यभरात ४० हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापन केली जाणार आहे. अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत केली.
हेही वाचा - 'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...
या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि संघटनात्मक कार्याची माहिती घेतली. दरम्यान, गाव तिथे काँग्रेस या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ४० हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच, बुथ काँग्रेस कमिट्यांचे पुर्नगठण करण्यात येणार आहे. या अभियानाची जबाबदारी प्रदेश आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ताकदीने हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.
हेही वाचा - 'सावध राहा..परत बोलाल तर लोकं तांगडून मारतील'