मुंबई मुंबईतील Mumbai Ganeshotsav परळ येथील नरे पार्क मैदानावर साजरा करणाऱ्या करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 76 वर्ष आहे. गेली कित्येक वर्ष गणरायाची उभ्या रूपातील मूर्ती या ठिकाणी बसवली Standing Ganesha feature of Nare Park जाते. भव्य गणेश मूर्ती हे या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे.
मुंबईतील परळ विभागात गेल्या 75 वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त सातत्याने चर्चेत असणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे नरे पार्क परळ गणेशोत्सव मंडळ. या मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गिरणगावातील श्रमिक भाविकांना आकृष्ट केले जाते. या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य, म्हणजे येथील गणेश मूर्ती. गेल्या कित्येक वर्षांपासून या गणेश मंडळात 22 फुटी गणेश मूर्ती विराजमान होत आहे. या ठिकाणी गणपतीची विविध रूपातील मूर्ती बसवली जाते. आतापर्यंत शंकर अवतार, वामन अवतार, विष्णू अवतार विठ्ठल रुपी गणेश मूर्ती तसेच अन्य रुपातील गणेश मूर्ती बसवण्यात आले आहेत. यंदा नरे पार्क गणेशोत्सव मंडळाने गजलक्ष्मी रुपातील २२ फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे. ही भव्य गणेश मूर्ती भाविकांना नक्की आवडेल. तिच्या गळ्यातील प्रचंड लक्ष्मी हार हे गजलक्ष्मीचे रूप दर्शवणारे आहे. maharashta news
भाविक नेहमीप्रमाणे या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतील, असा विश्वास मंडळाचे सरचिटणीस सुबोध रासम यांनी व्यक्त केला आहे. Standing Ganesha feature of Nare Park
हेही वाचा Mumbai Ganeshotsav 2022 दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी गणेशभक्तांची एकच झुंबड