मुंबई अवघ्या एक दिवसांवर आलेल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीला आता जोरात सुरुवात झाली arrival of beloved Ganaraya आहे. मागील दोन वर्षांपासून गणेश भक्त ज्या दिवसाची वाट बघत होते, तो दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे. या दिवसाच्या तयारीसाठी मुंबईतील दादर, क्रोफॉर्ड मार्केट अशा ठिकाणी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. बाप्पासाठी आरास बनवताना फुलांच्या मखराला high demand fresh flower Makhara यंदा गणेश भक्तांची पसंती मोठ्याप्रमाणात दिसत आहे.
विविधरंगी ताज्या फुलांपासून बनवितात मखर Ganeshotsav 2022 गणरायाच्या आरास सजावटीसाठीच्या for Bappas Aaras in mumbai विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असल्या, तरी यंदा विशेष करून दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी आरास करताना भाविक फुलांपासून बनविलेल्या आरासला जास्त प्राधान्य देत आहेत. दादर मधील फुल बाजारात विविध प्रकारच्या, विविधरंगी फुलांपासून बनविलेल्या मखराला मोठी मागणी आहे. फुलांची आरास करण्यासाठी लागणार्या विविध फुले इथे उपलब्ध आहेत. फुलांच्या सजावटीसाठी विविध साहित्य खरेदीसाठी दादर बाजारपेठेतील रानडे रस्ता, आयडियल गल्ली, फूल मार्केट आज सकाळपासून नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
ताज्या फुलांच्या आरासने घरातील वातावरण अधिकप्रसन्न प्स्टिक व थर्माकोलवर बंदी आहे. त्यामुळे बाजारांमध्ये थर्माकोलचे मकर दिसत नसले, तरी प्लास्टिकची आर्टिफिशयल चायनीज फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. ही फुले १५० रुपयांपासून असल्याने नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. दुसरीकडे इकोफ्रेंडली मखराची किंमत ही ३ हजारांपासून १५ हजारांपर्यंत आहे. परंतु भाविक ताज्या फुलांच्या मोठ्या प्रमाणात दिसत पसंती देत आहेत. चायनीज आर्टिफिशियल फुलांच्या तुलनेत ताजी फुले महाग असली, तरी दीड दिवसांच्या गणपतीला ताज्या फुलांची आरास छानच शोभून दिसते. तसेच घरातील वातावरणसुद्धा फुलांच्या सुवासाने प्रसन्न राहते. त्याचबरोबर गणपती बाप्पाची आरास करायला लागणार वेळ वाचतो, असे गणेश भक्त बबन सोरप यांनी सांगितले. ते मागील ५ वर्षांपासून ताज्या फुलांची आरास आपल्या घरच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पासाठी करत आहेत. या दिवसांत बाजारात फुलांचेच नाही, तर सर्वच वस्तूंचे भाव हे मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्तच असतात, असेही ते म्हणाले. Preparations in full swing for arrival of beloved Ganaraya