ETV Bharat / city

लॉकडाऊन इफेक्ट : अत्यावश्यक वस्तू पुरवणाऱ्या कामगारांचे जेवणाचे होताहेत हाल - disadvantages of dining during lock down

मुंबईत भाजी बाजारात काम करणारे कामगार काम तर करत आहेत. मात्र, त्यांच्या जेवणाचे मोठे हाल होत आहेत. सर्वकाही बंद असल्यामुळे त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे.

भाजी मार्केट मुंबई lockdown
माल वाहतुक कामगार
author img

By

Published : Mar 26, 2020, 4:50 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरस जगभर थैमान घालत आहे. भारतात देखील सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद आहे. त्यामुळे अनेक लोकांचे जेवणाचे हाल होताना दिसत आहेत. विशेषतः अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कामगारांचे जेवणाची गैरसोय होताना दिसत आहे.

माल वाहतूक कामगारांचे लॉकडाऊन दरम्यान जेवणाचे होत आहेत हाल...

हेही वाचा... चिंताजनक..! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 124, तर मृतांचा आकडा 4 वर

मुंबई तसेच नवी मुंबईत आजपासून अत्यावश्यक सेवा म्हणजेच मेडीकल, हॉस्टिलसह भाजीपाला बाजार सुरू करण्यात आलेला आहे. मुंबईत भाजी बाजारात काम करणारे कामगार काम तर करत आहेत. मात्र, त्यांच्या जेवणाचे मोठे हाल होत आहेत. सर्वकाही बंद असल्यामुळे त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. काही वेळेला काही मदतगार येऊन त्यांना जेवण देत आहेत. मात्र, हे पुढे देखील काही काळ असेच बंद राहिले, तर आम्ही परिश्रम करू मात्र, जेवणाचे काय ? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.

हेही वाचा... डॉक्टर, पोलिसांवर हल्ले कराल तर खबरदार, अन्यथा लष्कराला पाचारण करावे लागेल

मुंबईत नळ बाजार येथे कांदा बटाटा या अत्यावश्यक या वस्तूंची ने-आण करण्यासाठी एरवी गाड्या असतात. मात्र, लॉकडाउनमुळे सहजासहजी गाड्या अत्यावश्यक सेवा देण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सात ते आठ कामगार कांदा बटाटे हातगाडीवर घेऊन वाहतूक करत आहेत. मात्र, इतके परिश्रम करून त्यांना जेवणासाठी तळमळ करावी लागत आहे. त्यामुळे आमच्या जेवणाची सोय व्हावी, असे कामगार म्हणत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.