ETV Bharat / city

The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री करा नाहीतर...', भाजपचा राज्य सरकारला इशारा - भाजपा काश्मिर फाईल टॅक्स फ्री मागणी

'द काश्मीर फाइल्स' या ( The Kashmir Files ) चित्रपटाचे सध्या भाजपकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. राज्यभरात लोकांना या चित्रपटाचे मोफत शो दाखवले ( Free Show Of The Kashmir Files By BJP Leader ) जात आहेत. भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे ( Sachin Shinde ) यांनी दादरमध्ये या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले.

The Kashmir Files Free Show
The Kashmir Files Free Show
author img

By

Published : Mar 20, 2022, 3:15 PM IST

मुंबई - काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' या ( The Kashmir Files ) चित्रपटाचे सध्या भाजपकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. राज्यभरात लोकांना या चित्रपटाचे मोफत शो दाखवले ( Free Show Of The Kashmir Files By BJP Leader ) जात आहेत. भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे ( Sachin Shinde ) यांनी दादरमध्ये या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले.

'चित्रपट टॅक्स फ्री करा नाहीतर' -

यावेळी बोलताना सचिन शिंदे म्हणाले की, 'आपल्या देशात काश्मिरी पंडितांवर जो काही अन्याय झाला, त्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट इतर राज्यांमध्ये टॅक्स फ्री दाखवला जातो आहे. मात्र, आपल्याच राज्यात सत्य जनतेसमोर ठेवू नये, या कारणास्तव हा चित्रपट टॅक्स फ्री केला जात नाही. आमचं अजूनदेखील या सरकारला सांगणं आहे, लवकरात लवकर हा चित्रपट टॅक्स फ्री करा, अन्यथा आम्ही लोकांना मोफत हा चित्रपट दाखवू.

लोकांची गर्दी, प्रेक्षक भावूक -

हा चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर येणारा प्रेक्षक हा काहीसा भावूक झालेला दिसला. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा, असं आवाहन केलं. दरम्यान, हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून लोकांनी देखील त्याला उचलून घेतले आहे.

हेही वाचा - Football Gallery Collapsed In Kerala : फुटबॉल गॅलरी कोसळली! सुमारे 200 जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.