ETV Bharat / city

Passengers Looters arrested : चालत्या रिक्षात चाकूचा धाक दाखवत लूट; रिक्षाचालकासह ४ आरोपींना अटक

मुंबईत कुरार पोलिसांनी (Kurar Police Station Mumbai) रविवारी रात्री १८ सप्टेंबर रोजी मालाड पूर्व येथे दोन जणांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी (Robbery at knifepoint) एका ऑटोचालकासह चार जणांना अटक (auto driver arrested for robbery) केली आहे. दरोड्याच्या काही तासांतच आरोपींना पकडण्यात (robber arrested Mumbai Malad East) पोलिसांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेले चौघे आरोपी व पोलीस चमू

author img

By

Published : Sep 23, 2022, 12:30 PM IST

मुंबई: मुंबईत कुरार पोलिसांनी (Kurar Police Station Mumbai) रविवारी रात्री १८ सप्टेंबर रोजी मालाड पूर्व येथे दोन जणांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी (Robbery at knifepoint) एका ऑटोचालकासह चार जणांना अटक (auto driver arrested for robbery) केली आहे. दरोड्याच्या काही तासांतच आरोपींना पकडण्यात (robber arrested Mumbai Malad East) पोलिसांना यश आले आहे. ऑटोचालक आकाश शिंदे आणि त्याचे साथीदार गणेश राजे, महेश कांबळे, सनी घोडे आणि राम राजे अशी आरोपींची नावे आहेत. (Latest Crime news from Mumbai)

चालत्या रिक्षात गुन्हा - पिडीत दीनबंधू दास आणि कलन दुलई हे दोघे मालाडमधील लक्ष्मण नगरमधील रेस्टॉरंटच्या बाहेर रिक्षा भाड्याने घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा आरोपी रिक्षाचालक त्यांच्याजवळ पोहोचले. रिक्षात इतर आरोपी सुध्दा उपस्थित होते. रिक्षाचालकाने पिडीत व्यक्तीना गंतव्यस्थानावर नेण्याची ऑफर दिली. पीडित व्यक्ती आरोपी रिक्षाचालकाला ओळखत असल्याने त्यांनी प्रवास करण्यास मान्य केले. काही अंतरावर, आरोपींपैकी एकाने चाकू काढला आणि पीडित व्यक्तीच्या गळ्याला लावत त्याच्याकडे असलेली सर्व रोकड काढून देण्यास सांगितले. दोन्ही आरोपींना लुटल्यावर त्यांनी मग दोघांना धावत्या ऑटोतून ढकलून दिले. दोन्ही पीडितांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीत कैद झालेले चौघे आरोपी
सीसीटीव्हीत कैद झालेले चौघे आरोपी

पोलिसांची कारवाई - कुरार पोलीस पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि काही तासांतच कुरारच्या विविध भागांतून आरोपींना पकडले. सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की काही आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर कुरार आणि इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी रात्रीच्या वेळी ऑटोमध्ये फिरून बारच्या बाहेर रिक्षाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना टार्गेट करत त्यांना लुटायचे. अशा किती कारवाया आरोपींनी केल्या आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.