मुंबई - जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आयआयटी मुंबई येथे सुरू होणाऱ्या 'टेकफेस्ट' या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या महाउत्सवात भूतानचे माजी पंतप्रधान दाशो शेरिंग टोबगे हे पर्यावरण संवर्धनाचे धडे देणार आहेत. मुंबईकरांना पहिल्यांदाच भूतानमधील एका वरिष्ठ पदावरील व्यक्तीचे मार्गदर्शन संधी टेकफेस्टच्या माध्यमातून मिळणार आहे. यासोबत देशविदेशातील अनेक तज्ज्ञ, तंत्रस्नेही अभ्यासकही या टेकफेस्टला उपस्थित राहणार आहेत.
![iit mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-iit-mum-tecfest-expm-bhutan-7201153_20122019181852_2012f_1576846132_747.jpg)
हेही वाचा - आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयआयटी मुंबईमध्ये जगभरातील तंत्रविज्ञानचे विद्यार्थी आणि विविध नामांकित विद्यापीठांच्या तंत्रज्ञानाचा आविष्कार टेकफेस्टमध्ये अनुभवायला मिळणार आहे. या माध्यमातून युरोप, आशिया खंडासह जगभरातील असंख्य तंत्रस्नेही विद्यार्थी आणि विद्यापीठ त्या टेक्स्टमध्ये सहभागी होणार आहेत. या टेकफेस्टच्या महाउत्सवात पर्यावरण आणि त्याचे संवर्धन या विषयावर भूतानचे माजी पंतप्रधान दाशो शेरिंग टोबगे हे 3 जानेवारीला मार्गदर्शन करणार आहेत.
![iit mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-iit-mum-tecfest-expm-bhutan-7201153_20122019181852_2012f_1576846132_379.jpg)
भूतानमध्ये दाशो शेरिंग टोबगे यांनी जुलै 2013 ते ऑगस्ट 2018 या कालावधीत प्रदूषणाच्या संदर्भात खूप मोठे काम उभे केले असल्याने त्यांची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. हाच वारसा इतर देशांनी आणि विशेषत: तरुणांनी कसा घ्यावा, यासाठी दाशो शेरिंग टोबगे यांचे प्रमुख मार्गदर्शन टेकफेस्टमध्ये होणार आहे.
![iit mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-iit-mum-tecfest-expm-bhutan-7201153_20122019181852_2012f_1576846132_66.jpg)
जागतिक स्तरावर प्रदूषण आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न चर्चिला जात असून त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. त्यातच पर्यावरण संवर्धनासाठी जगभरातील तरुणांनी नेमकी कोणती पावले उचलण्याची गरज आहे, यावर टेकफेस्टमध्ये प्रकाश टाकला जाणार आहे.