ETV Bharat / city

अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण : माजी पोलीस अधिकारी सुनील मानेला न्यायालयीन कोठडी - antilia bomb scare

अँटिलिया आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सुनील मानेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Sunil Mane
सुनील माने
author img

By

Published : Jun 25, 2021, 10:12 PM IST

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाच्या निवासस्थानाजवळ वाहनात स्फोटकं ठेवण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सुनील मानेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना एनआयएच्या कोठडीत 1 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

एप्रिलमध्ये मानेला अटक करण्यात आली होती, तर 11 जून रोजी शेलार आणि जाधव यांना अटक करण्यात आली होती. माने पूर्वी न्यायालयीन कोठडीत होता. या खटल्याची चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) नुकत्याच अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी पुन्हा ताबा मागितला होता, तो मंजूर झाला आहे. सुनील मानेचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे. शेलार व जाधव यांना न्यायाधीश पीआर सितारे यांच्यासमोर हजर केले होते.

एनआयएचे आरोप -

शेलार आणि जाधव यांच्या रिमांडची मुदतवाढ देण्याची विनंती करत एनआयएने म्हटले होते की, हिरेनच्या हत्येप्रकरणी वापरलेली गाडी सापडल्यानंतर हे दोघे बेपत्ता होते. दोघेही दिल्लीत तसेच काही अन्य ठिकाणी गेले होते, त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील लातूर येथून अटक करण्यात आली होती.

तपास यंत्रणांनी न्यायालयाला सांगितले की, हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसया कोणाशीतरी संपर्कात होते आणि त्यांच्या कामांसाठी पैसे कोणाला दिले जात होते याचा शोध घ्यावा लागेल.

सुनील माने कोण आहे?

सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. नंतर त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये दोन महिन्यांपूर्वी सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला. सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.

मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग?

हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी सुनील माने ठाण्यात होता. मानेने त्याचा फोन एका बॅगेमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती, जेणेकरून त्याचे लोकेशन तेच दिसावं. सुनील माने यानेच तावडे बनून मनसुख यांना फोन करुन बोलावून घेतलं. त्यानंतर सचिन वझे आणि सुनील माने एकत्र त्याला भेटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.