मुंबई - परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाला यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर उपस्थित न झाल्याने परमबीर सिंह यांना पंचवीस हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. यासाठी सरकारद्वारे एक सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले होते. या समितीसमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याची संधी परमबीर सिंह यांना देण्यात आली होती.
परमबीर सिंह यांच्याकडून वकील संजय जैन आणि अनुकूल सेट यांनी समितीला सांगितलं की, मुंबईचे माजी पोलीस अधिकारी यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत समितीत अस्तित्व आणि समितीद्वारे पाठवण्यात आलेले समन्स याला आव्हान दिलं आहे. परमबीर सिंह त्या वकिलांनी समितिची सुनावणी स्थगित करण्याची मागणी दखील केली आहे. तसेच उपरोक्त याचिकेवर 23 ऑगस्टला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र परमबीर सिंह यांच्या या मागणीचा अन्य साक्षीदार आणि वकिलांनी विरोध केला.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर सांगितलं की, या प्रकरणाचा तपास निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. 30 जुलैला जो आदेश दिला होता त्या देशावर उशिरा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रश्नांमुळे तपासा थांबवता येणार नाही. आयोग पुढे म्हणाले की, परमबीर सिंह त्यांनी वेळेचे पालन केलं पाहिजे. एक संधी म्हणून 25 ऑगस्टला आयोगासमोर साक्ष द्यावी लागणार आहे. तसेच दंड म्हणून 25 हजार रुपयाची रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, अशा सूचना आयोगाने दिल्या.