मुंबई - मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटील याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्याने अभिनेता साहिल खानचा उल्लेख केला आहे. मनोज पाटील सध्या कूपर रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटीलने गोळ्या(औषध) घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचे मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न मिस्टर इंडिया राहिलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मनोज पाटीलचा आरोप आहे. याशिवाय व्यावसायिक तसेच इतर वादही होते. याशिवाय साहिल खान सोशल मीडियावर आपली बदनामी करत होता, असेही मनोज पाटीने म्हटले आहे. या सर्व गोष्टींमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न या प्रकरणी मनोज पाटीलच्या कुटुंबाकडून ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी दुपारी मनोज पाटीलच्या कुटुंबीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - केश कर्तनालयांप्रमाणेच जिमलाही परवानगी द्यावी; बॉडीबिल्डर व जिम मालकांची मागणी
हेही वाचा - आयकर विभागाकडू सोनू सूदच्या घराची तब्बल 20 तास झाडाझडती, मात्र हाती काय लागले याची सर्वत्र चर्चा