मुंबई - एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मतपरिवर्तन कसे होऊ शकते ? असा टोला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सोमवारी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनीच सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक Election of Mayor Directly from people घेण्यासंबंधीचे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे, यासाठी वकिली केली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की आम्हीही प्रभावित होऊन त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला. त्यांनी इतकी चांगली वकिली केली की, देवेंद्र फडणवीसही त्यांना विरोध करू शकले नाही. आज ते पुन्हा सांगत आहेत की थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडायचे यावर जयंत पाटील Former Water Resources Minister Jayant Patil यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.
सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक घेण्यासंबंधीचे विधेयक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मांडले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नगरविकास मंत्री असताना थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे तोटे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर आता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीवर विधेयक मांडण्यात आले. या दोन्ही विरोधी भूमिका असल्याने जयंत पाटील यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.
हेही वाचा - Ajit Pawar तर मुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतून निवडून द्या, अजित पवारांचा राज्य सरकारला टोला