मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कर्नाटकातील नेत्याची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी लोकसभेचे विरोधी माजी विरोधी पक्षनेते व कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे राज्याचे प्रभारी होते. आता त्यांच्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसने महाराष्ट्राला कर्नाटकमधील काँग्रेस नेता दिला असून यासाठी माजी मंत्री एच. के. पाटील यांची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची नियुक्ती केली आहे. पाटील यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट जारी केले. त्यात त्यांनी 'आदरणीय खा. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी दिलेले नेतृत्व आणि केलेले मार्गदर्शन यासाठी त्यांचे आभार. महाराष्ट्रातील काँग्रेसजन कायम त्यांचे ऋणी राहतील. ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!' असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
आदरणीय खा. मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांनी दिलेले नेतृत्व आणि केलेले मार्गदर्शन यासाठी त्यांचे आभार. महाराष्ट्रातील काँग्रेसजन कायम त्यांचे ऋणी राहतील.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची महाराष्ट्र प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/l44OfC6Oxx
">आदरणीय खा. मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांनी दिलेले नेतृत्व आणि केलेले मार्गदर्शन यासाठी त्यांचे आभार. महाराष्ट्रातील काँग्रेसजन कायम त्यांचे ऋणी राहतील.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 11, 2020
ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची महाराष्ट्र प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/l44OfC6Oxxआदरणीय खा. मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांनी दिलेले नेतृत्व आणि केलेले मार्गदर्शन यासाठी त्यांचे आभार. महाराष्ट्रातील काँग्रेसजन कायम त्यांचे ऋणी राहतील.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 11, 2020
ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची महाराष्ट्र प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/l44OfC6Oxx
'काँग्रेस हाय कमांडने मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिली आहे. कार्यकारीणी समितीतही काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्र देशातील मोठ्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे भविष्यात अनेक आव्हाने असतील. त्यामुळे पक्षाला संघटीत करण्याचे मी नियोजन केले आहे. मी विद्यार्थीदशेत असताना काँग्रेस पक्षात आलो होतो. पक्षात मला अनेक पदे मिळाली. माझ्याआधी मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्रात काम केले आहे, आता मला त्यांच्याकडून पक्ष बांधणीसाठी मार्गदर्शन मिळेल, असे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप पक्षावरही निशाणा साधला. कोरोनाग्रस्तांना उपचार देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. रुग्णालयांमध्ये पर्याप्त सुविधा नाहीत, सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी देत आहे, असा आरोप त्यांनी केला.
मागील पाच वर्षात राज्यात काँग्रेस सत्तेवर नसताना आणि विशेष म्हणजे याच काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलेला असताना यावेळी काँग्रेसचे प्रभारी म्हणून राज्यात मल्लीकार्जून खरगे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू आलेल्या गटबाजीवर त्यांनी अंकुश आणला होता. मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांना बाजूला करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे निरुपम यांनी केलेल्या टिकेमुळे चर्चेत राहिले होते. तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळेही खरगे यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून बरीच टीका झाली होती.
कोण आहेत एच. के. पाटील -
नवनियुक्त प्रभारी एच. के. पाटील हे अत्यंत ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. कर्नाटक सरकारमध्ये ग्रामविकास, जलसंधारण, कृषी, संसदीय कार्य, वस्त्रोद्योग अशा महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपदे त्यांनी जबाबदारीने पार पाडलेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राज्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही - मुख्यमंत्री