ETV Bharat / city

Anil Deshmukh Judicial Custody : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढ

अनिल देशमुख ( Anil Deshmukh In ED Custody ) गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असता त्यांना आज पुन्हा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी अनिल देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात ( Anil Deshmukh Judicial Custody Extend ) आले आहे.

Anil Deshmukh Judicial Custody
Anil Deshmukh Judicial Custody
author img

By

Published : Dec 27, 2021, 6:44 PM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख ( Anil Deshmukh In ED Custody ) गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असता त्यांना आज पुन्हा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी अनिल देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात ( Anil Deshmukh Judicial Custody Extend ) आले आहे. ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 55 दिवसांपासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहे.

29 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा कस्टडी -

ईडीकडून अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांना 15 दिवस 'ईडी' कस्टडीमध्येदेखील ठेवले होते. त्यानंतर आलेले देशमुख यांना 12 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत कस्टडीत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आज 13 डिसेंबररोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कस्टडी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला आहे.

काय आहे प्रकरण? -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा - FIR against Kalicharan Maharaj : महात्मा गांधींबाबत विवादित वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.