ETV Bharat / city

Former Home Minister Anil Deshmukh माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज - Anil Deshmukh Send Back to Arthur Road Jail

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जे जे रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात Anil Deshmukh Discharged From J J Hospital आला आहे. देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयामध्ये शुक्रवारी Deshmukh was Admitted to J J Hospital on Friday दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची पुन्हा आर्थर रोड कारागृहामध्ये रवानगी करण्यात Anil Deshmukh Send Back to Arthur Road Jail After Being Discharged आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 27, 2022, 1:48 PM IST

मुंबई माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जे जे रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला Anil Deshmukh Discharged From J J Hospital आहे. देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयामध्ये Deshmukh was Admitted to J J Hospital on Friday शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची पुन्हा आर्थर रोड कारागृहामध्ये रवानगी Anil Deshmukh Send Back to Arthur Road Jail After Being Discharged करण्यात आली आहे.

वैद्यकीय तपासण्या करून सोडले देशमुख यांना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास जे. जे. रुग्णालयात आणले. त्यांच्यावर उपचार व अन्य वैद्यकीय तपासण्या करून सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांना मागील वर्षी अटक केली आहे. ईडीने अटक केल्यावर त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. मात्र, अटकेत असल्यापासून त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान देशमुख यांच्या वकिलांकडून आरोग्याच्या संदर्भात सुरू असलेल्या समस्यांमुळे त्यांना जामीन देण्यात यावे, असा युक्तिवाददेखील करण्यात आला आहे. मात्र, अद्याप जामीन अर्जावर निकाल येणे बाकी आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

सकाळी देशमुख हे चक्कर येऊन कारागृहात पडले मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी देशमुख यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर ते चक्कर येऊन पडले. कारागृहातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलविले. यापूर्वीही एप्रिल महिन्यात आर्थर रोड कारागृहात चालताना पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. आहे. त्यानंतर जे. जे. रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

ईडीने अटक केल्यापासून ते कारागृहातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या 100 कोटी वसुली भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्याच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास करीत असलेल्या ईडीने 1 नोव्हेंबरला रात्री देशमुखांना अटक केली. तेव्हापासून ते कारागृहातच आहेत.

हेही वाचा स्वप्ना पाटकरांची संजय राऊत यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात जबानी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.