नवी मुंबई - महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामधील संघर्ष दिवसागणित वाढताना दिसत आहे. असे असताना रायगडमधील भाजपा नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( BJP Ex MP praises CM) याचं कौतुक केल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आल आहे.
प्रस्तावित नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील ( DB Patil Name For Mumbai Airport ) यांचे नाव देण्यासाठी स्थानिक नामकरण कृती समितीच्यावतीने अनेक आंदोलने केली गेली. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यामुळे समितीचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर ( BJP Ex MP Ramseth Thakur ) यांनी यावर बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच कौतुक करत ठाकरे शैलीप्रमाणे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि उद्धव ठाकरेंची पद्धत यात तफावत असून त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना लक्षात घेऊन याबाबत योग्य निर्णय घ्यावा, कारण उद्धव ठाकरे हे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. माझे खूप वेळा त्यांच्याबरोबर राजकीय बोलणे झाले. मात्र, त्यावर एकमत कधी झाल नसल्याचेदेखील रामशेठ ठाकूर म्हणाले. ठाणे-बेलापुर रायगड पट्यात आगामी काळात तीन महानगरपालिकांचा पंचवार्षिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरणाचा मुद्दा प्रकल्पग्रस्थानसाठी भावनिक आहे. यामुळे येत्या काळात माजी खासदार व भाजप नेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या या वक्तवयाचे कसे पडसाद उमटतात हेच पहाव लागेल.