मुंबई - राज्य सरकारने काढलेल्या ग्लोबल टेंडरला अद्याप विदेशी कंपन्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ग्लोबल टेंडरची तारीख 25 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने अजून राज्य सरकारला परवानगी दिली नसल्याने विदेशी कंपन्याचा प्रतिसाद मिळत नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शंका उपस्थित केली आहे.
राज्यात झपाट्याने लसीकरण व्हावे, म्हणून राज्य सरकारकडून ग्लोबल टेंडर काढण्यात आली आहेत. हे टेंडर पाच कोटी लसींसाठी काढण्यात आली असली तरी, अद्याप या ग्लोबल टेंडरला कोणत्याही विदेशी कंपनीने प्रतिसाद दिला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्लोबल टेंडरची तारीख वाढवून 25 मे पर्यंत करण्यात आली असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. ग्लोबल टेंडरसाठी अजूनही केंद्र सरकारच्या काही परवानग्या शिल्लक आहेत. त्या परवानग्या मिळत नसल्याने विदेशी कंपन्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद देत नसल्याची शंका आरोग्य मंत्र्यांकडून उपस्थित केली गेली. मात्र लवकरच या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळून राज्यासाठी पाच कोटी लस उपलब्ध होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
'पाच कोटी लसींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला विदेशी कंपन्यांचा अद्याप प्रतिसाद नाही' - कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर
राज्य सरकारने काढलेल्या ग्लोबल टेंडरला अद्याप विदेशी कंपन्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ग्लोबल टेंडरची तारीख 25 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने अजून राज्य सरकारला परवानगी दिली नसल्याने विदेशी कंपन्याचा प्रतिसाद मिळत नसल्याची आरोग्यमंत्र्यांनी शंका उपस्थित केली आहे.