मुंबई - मार्चमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला आणि अशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाने शिरकाव केला. यानंतर आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला. दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीत कोरोनाला कसे नियंत्रणात आणायचे हा प्रशासनासमोरचा गहनचा प्रश्न होता. तर दुसरीकडे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून धारावीकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाऊ लागले. मात्र आज याच धारावीने कोरोनाला हरवून दाखवले आहे. आज धारावीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. ही धारावी आणि मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. एकूणच धारावी आता कोरोनामुक्त होत आहे, असे म्हटले जात आहे.
एप्रिल-मे मध्ये वाढली होती धारावीकरांची धास्ती -
एप्रिलमध्ये धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर ही रुग्ण संख्या वाढतच जाऊ लागली आणि बघता-बघता धारावी कोरोनाचे मुंबईतील सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागले. एप्रिल-मे महिना धारावी करांची धास्ती अधिकच वाढवणारा होता. पुढे तर दिवसाला येथे 60-70 हुन अधिक रुग्ण दिवसाला आढळू लागले. धारावी आणि धारावीकरांची चिंता अधिक वाढू लागली.
पालिका-खागसी डॉक्टर कॊरोना नियंत्रणासाठी सरसावले -
धारावीत कोरोना कहर एप्रिल-मे मध्ये वाढला. धारावीत कोरोना रुग्णांची संख्या वाढणे हे मुंबईकरांना कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नव्हते. त्यामुळे अखेर पालिका आणि खासगी डॉक्टर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरले. धारावीच्या गल्ली बोळात जाऊन पालिका-खासगी डॉक्टरांनी स्क्रिनिंग करत वेळेत संशयित रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना विलग केले. त्यांच्या तपासण्या करत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेत उपचार दिले. धारावी दोन महिन्यांहून अधिक काळासाठी लॉकडाऊन केली त्याचबरोबर अन्यही उपाययोजना राबवल्या.
प्रयत्नांना यश -
पालिका-खाससी डॉक्टर आणि धारावीकरांच्या प्रयत्नांना अखेर जून-जुलैमध्ये यश येण्यास सुरुवात झाली. हळूहळू रुग्ण कमी होऊ लागले. बघता-बघता एक आकडी रुग्ण धारावीत आढळू लागले आणि आज तर धारावीत एकही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. ही अतिशय दिलासादायक बाब मानली जात आहे. तर ही परिस्थिती अशीच राहिली तर धारावी खऱ्या अर्थाने कोरोना मुक्त होईल. दरम्यान धारावीने कोरोना नियंत्रणात आणून दाखवल्याने याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने धारावीकरांचे, पालिकेचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय मीडियानेही धारावीतील कोरोना नियंत्रणाची दखल घेतली आहे हे विशेष.
धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने.. मार्चपासून आज पहिल्यांदाच नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्यावर
कोरोनाचा प्रसार रोखण्यात जागतिक रोल मॉडेल ठरलेल्या धारावीने आणखी एक पराक्रम करून दाखविला आहे. आशिया खंडातील ही सर्वात मोठी झोपडपट्टी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून आज तब्बल नऊ महिन्यानंतर शुक्रवारी धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नाही.