ETV Bharat / city

Mahaparinirvan Day 2021 : बाबासाहेबांना अभिवादनासाठी देशभरातील अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने (Mahaparinirvan Day) त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून अनुयायी दाखल झाले आहेत. शिस्तबद्ध पध्दतीने अभिवादन करता यावे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Mahaparinirvan Day 2021
Mahaparinirvan Day 2021
author img

By

Published : Dec 5, 2021, 9:06 PM IST

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने (Mahaparinirvan Day) त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून अनुयायी दाखल झाले आहेत. शिस्तबद्ध पध्दतीने अभिवादन करता यावे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चैत्यभूमीवर कोरोना चाचणी, प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

६ डिसेंबरला गर्दी वाढण्याची शक्यता -

महापरिनिर्वाण दिनाच्या दोन दिवस आधीच राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. आज रविवारी सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्य़भूमीच्या (Followers At Chaityabhoomi) दिशेने अनुयायी दाखल झाले. सोमवारी, ६ डिसेंबरला गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने बॅरेकेट्स लाऊन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी करू नका, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळा, असे आवाहन केले जाते आहे. मुंबई महापालिकेनेही सर्व सुविधा, सेवा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाचे व्यवस्थापक काश्यप बौद्ध तथा प्रदीप कांबळे यांनी सांगितले.

विविध स्टॉल लावू नये; पालिकेने आवाहन -

विविध स्टॉल लावू नयेत यासाठी पालिकेने आवाहन केले होते, त्य़ाला लोकांनी प्रतिसाद देत स्टॉल व मंडप उभारणे टाळले आहे. येथे येणाऱ्यांची अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी केली जाते आहे. तसेच लसीकरण मोहिमही राबवली जाते आहे. दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील फेरीवाल्यांना उठवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले आहेत. अभिवादनासाठी येणाऱ्यांना शिस्तीने जाता येईल, अशी सोय प्रशासनाने केली आहे. गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग राहिल याची खबरदारी घेतली जाते आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच रेल्वे व बेस्टने प्रवासाची मुभा असल्याने तपासणीही वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानक व परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन -

चाळी, वसाहतीत अभिवादन कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येईल. कोरोनाचे नियम पाळून बाबासाहेबांच्या विचारांवर भीमगीते, जलसा, विचारमंथनाचे कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत चैत्यभूमीसह चाळी, वसाहतीत आयोजित करण्यात आले आहेत. बाबासाहेबांच्या राजगृह निवासस्थान, चेंबूर येथील आंबेडकर उद्यान परिसर, अनेक वसाहतींतून तसेच समाज माध्यमांवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

हेही वाचा - Omicron In Maharashtra: नायझेरीयावरून आलेल्या कुटुंबाला ओमायक्रॉनचा संसर्ग; राज्यात रुग्णांची संख्या 9 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.