मुंबई - महानगरपालिकेच्या उपनगरात डेल्टा प्लसचे 5 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बीएमसीला उपनगराच्या पूर्व भागात 4 आणि पश्चिम भागात 1 असे एकूण 5 रुग्ण सापडले आहेत.
कोविडला हलक्यात घेऊ नये
मुंबईत 17 पैकी 10 रुग्ण बरे झाले आहेत. 7 रुग्ण अजूनही बाकी आहेत. त्यापैकी 2 रुग्णालयात आहेत. आर दक्षिण वॉर्डच्या सहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले, की “शहरात हळूहळू कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. तज्ज्ञांनी पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकांनी कोविडला हलक्यात घेऊ नये. आम्ही आता संपर्क तपासणी करत आहोत. आम्हाला 17 रुग्ण आढळल्यानंतर महावीर नगर स्थित सोसायटीला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे".
हेही वाचा -मुंबईच्या विद्यार्थीनीवर म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण