मुंबई - कांदिवली परिसरातील हाय प्रोफाइल हिरानंदानी हेरिटेज इमारतीत 30 मे रोजी फेक व्हॅक्सिन ड्राईव्ह पार पडले असल्याची तक्रार मुंबई पोलिसांनी मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
30 मे रोजी लस शिबिराचे केले होते आयोजन -
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज येथे 30 मे रोजी लस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सोसायटीच्या व्यवस्थापनाने मुंबईच्या अंधेरी परिसरातील सुप्रसिद्ध रुग्णालयाच्या महेंद्रसिंग नावाच्या पीआरओशी संपर्क साधला होता. महेंद्रसिंगने संजय गुप्ता नावाच्या मध्यस्थीमार्फत हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये लसीकरण केले. लस दिल्यांनतर 4-5 दिवसानंतर प्रमाणपत्र मिळेल, असे सोसायटीच्या लोकांना सांगण्यात आले. मात्र, जेव्हा लोकांना प्रमाणपत्र मिळाले, तेव्हा प्रमाणपत्रावरील वेळ आणि तारीख चुकीची नमूद केल्याचे आढळून आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने सोसायटीमधील लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
महेंद्रसिंगच्या खात्यातून पोलिसांनी 9 लाख रुपये जप्त -
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी यात सहभागी रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील पहिला आरोपी 10 वी नापास असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. तो गेल्या 17 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालये आणि डॉक्टरांच्या तो संपर्कात होता. तर दुसरा आरोपी संजय गुप्ता, सोसायटीमध्ये कॅम्प ऑर्गनायझर म्हणून काम करतो. तिसरा आरोपी ललित उर्फ चंदन सिंह हा मुंबईतील नामांकित रुग्णालयात काम करतो. दरम्यान, महेंद्रसिंगच्या खात्यातून पोलिसांनी 9 लाख रुपये जप्त केले आहे.
हेही वाचा - अँटिलिया स्फोटक प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; 'हे' आहेत खलनायक