ETV Bharat / city

Maharashtra Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा साडेपाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी - महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( Maharashtra State Council Of Examination ) घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५ लाख ४६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पाचवी आणि आठवी अशा दोन वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Maharashtra Scholarship Exam
Maharashtra Scholarship Exam
author img

By

Published : Jan 1, 2022, 4:38 PM IST

मुंबई : पाचवी आणि आठवी अशा दोन्ही वर्गांमधील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेला ( Maharashtra Scholarship Exam ) यंदा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( Maharashtra State Council Of Examination ) प्रतिवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. 2021-22 साठी होणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तब्बल ५ लाख ४६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

गतवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षेला फारच कमी नोंदणी झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने 2021-22 साठी ५ लाख ४६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीच्या राज्यातील ३८ हजार ७३४ शाळांमधील ३ लाख १६ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील २ लाख १९ हजार ७ विद्यार्थ्यांना शुल्क भरून आपली नोंदणी निश्चित केली आहे, तर ९७ हजार ३५४ विद्यार्थ्यानी अद्याप शुल्क भरलेले नाही.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निकाल

कोरोनाचा प्रादुर्भवामुळे 2020-21 ची शिष्यवृत्ती परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागली होती. अखेर नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबईतील पालिका शाळा वगळता संपूर्ण राज्यात यशस्वीरित्या परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.