गुजरात - गिर सोमनाथ परिसरात बुधवारी रात्री सातत्याने पाऊस सुरू आहे. तसेच या परिसरात जोरदार वारेही वाहत आहे. त्यामुळे या भागात 10 ते 15 बोटी ( fishing boats sink in Nava Bandar) बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत बोटीमध्ये मच्छिमारही होतो.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे गुजरात परिसरात मोठ्या प्रमाणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. जोरदार वाऱ्यामुळे उना समुद्रात ( boats sunk in Sea of Una ) 15 बोटी बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चार मच्छिमार हे किनाऱ्यावर परतले आहेत. तर काही जण अद्याप बेपत्ता झाले आहेत. यामुळे मच्छिमारांचे आणि बोटींचे खूप मोठे नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
हेही वाचा - Cyclone Jawad Alert : राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; जोवाड चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी !