ETV Bharat / city

कोस्टल रोड विरोधात मच्छीमारांचे आंदोलन, सोमवारी तोडगा - कोस्टल रोड

मुंबई महापालिका व सत्ताधारी शिवसेनेचा कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कोस्टल रोडला प्रकल्पामुळे आपल्या रोजीरोटीवर परिणाम होणार असल्याने वरळी कोळीवड्यातील मच्छिमारांनी आंदोलन उभारले आहे. यामुळे पालिकेने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे ही कारवाई उद्यापर्यंत (दि. 22) रोखली असून त्यावर उद्या (सोमवार) तोडगा काढला जाणार आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Nov 21, 2021, 4:30 PM IST

मुंबई - मुंबई महापालिका व सत्ताधारी शिवसेनेचा कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कोस्टल रोडला प्रकल्पामुळे आपल्या रोजीरोटीवर परिणाम होणार असल्याने वरळी कोळीवड्यातील मच्छिमारांनी आंदोलन उभारले आहे. यामुळे पालिकेने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे ही कारवाई उद्यापर्यंत (दि. 22) रोखली असून त्यावर उद्या (सोमवार) तोडगा काढला जाणार आहे.

कोस्टल रोडला मच्छिमारांचा विरोध -

मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी वाहतूक कोंडी होत असल्याने कोस्टल रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. समुद्रामध्ये भुयारी आणि पुलामार्गे पश्चिम उपनगरात जाण्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड उभारला जात आहे. समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पिलरमुळे व्यवसायावर परिणाम होणार असल्याने या प्रकल्पाला मच्छिमारांकडून विरोध केला जात आहे. यासाठी मच्छिमारांनी आंदोलन उभारले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सुरू असलेला मच्छीमारांचा संघर्ष आता पोलीस यंत्रणांच्या अनधिकृत सहायाने हाणून पाडण्याचा विडा मुंबई महानगरपालिकेने उचलेला असल्याचे वरळी कोळीवाड्यात दिसून आले. कोळीवाड्यात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

उद्या तोडगा -

मुंबई महानगरपालिकेच्या सांगण्यावरून वरळी कोळीवाड्यात पोलिसांनी मोठा ताफा तैनात केला होता. सगळ्या प्रकारचे दबाव तंत्र संपल्यामुळे आता पोलीस बळाचा वापर महापालिकेकडून होताना दिसत असल्याचे मत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी व्यक्त केले. या घडामोडीची दखल मत्स्यव्यवसाय मंत्री आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी घेतली असून त्यांच्या पुढाकाराने महापालिकेमार्फत होऊ घातलेल्या पोलिसांची अवैध कारवाई थांबवण्यात आल्यामुळे मच्छिमारांच्यावतीने तांडेल यांनी मंत्री शेख यांचे आभार मानले आहेत. तीन दिवसांसाठी महानगरपालिकेला काम स्थगित ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सोमवारपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याची माहिती तांडेल यांनी दिली.

हे ही वाचा - ST Strike : - सरकारचे सोमवारी तेरावे, मंगळवारी चौदावे तर बुधवारी घालणार श्राद्ध!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.