मुंबई - पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने सरकारने मासेमारी करण्यास दोन महिन्याची बंदी घातली आहे. तरीही, मासेमारी होत असल्याने महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय विभागाने खबरदारी म्हणून भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलेला होता. परिणामी मोरा, अलिबाग आणि उरणला फेरी बोटीमार्फत जाणाऱ्या प्रवाशांना भाऊच्या धक्क्यावर ( Ban on fish sales at Bhaucha Dhakka ) पोहोचण्यासाठी पायपट्टी करावी लागत होती. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता आता काही अटी आणि शर्ती घालून सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यत भाऊचा धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार सुरु ठेवण्याचा निर्णय मत्स्य विभाग ( Fisheries Department of State of Maharashtra ) आणि मुंबई पोस्ट ट्रस्टकडून घेण्यात आलेला आहे.
दोन हजार पेक्षा जास्त प्रवाशांची गैरसोय : पावसाळ्यात सागरी माशांचे प्रजनन काळ असल्याने सागरी मासेमारी १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय विभागाने घेतला आहे. तसेच सर्व मासेमारी करणारे बंदरे सुद्धा बंद करण्यात आले आहे. या दोन महिन्याचा कालावधीत कोण्ही मासेमारी करणार नाही याची काळजी मत्स्य व्यवसाय विभागाकडून घेण्यात येत आहे. भाऊचा धक्कावर मासळी विक्रीचा मागून मासेमारी होत असल्याचा भीतीपोटी मत्स्य व्यवसाय विभागाने भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश मुंबई पोस्ट ट्रस्टला दिले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने बेस्ट बस, टॅक्सी आणि खासगी वाहनांना सुद्धा प्रवेश बंद करण्यात आला होता. यामुळे फेरी बोटीचा दोन हजार पेक्षा जास्त प्रवाशांना भाऊच्या धक्क्यावर मुख्य प्रवेशद्वारापासून धक्कावर पोहचण्यासाठी पायपट्टी करावी लागत होती. तसेच फेरी बोटी चालकांचा व्यवसायावर सुद्धा परिणाम होत असल्याची भीती बोटी चालकांकडून व्यक्त केली जात होती.
प्रवाशांना मोठा दिलासा : प्रवाशांना तक्रारीनंतर आज भाऊच्या धक्क्यावर मुंबई पोस्ट ट्रस्ट, मत्स्य व्यवसाय विभाग, स्थानिक पोलीस विभाग आणि फेरी बोटी चालकांची आज बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत फेरी बोटी चालकांचे मत मुंबई पोस्ट ट्रस्ट, मत्स्यव्यवसाय विभागाचा अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता काही अटी आणि शर्ती घालून सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यत भाऊचा धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार सुरु ठेवण्याचा निर्णय मत्स्य विभाग आणि मुंबई पोस्ट ट्रस्टकडून घेण्यात आलेला आहे. या निर्मानामुळे समुद्र मार्गाने प्रवासी करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भाऊच्या धक्क्यावरील मासे विक्रीवर नजर : भाऊच्या धक्क्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मासे विक्रीवर सुरु आहे. पावसाळ्यात मासेमारी करण्यास बंदी असली तरी भाऊच्या धक्क्यावर मासे विक्री होत असते. या मासे विक्रीचा आळून मोठ्या प्रमाणात माशांच्या प्रजननाचा काळ मासेमारी केली जात असल्याचे निरीक्षण मुंबई पोस्ट ट्रस्ट आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे आहे. यामुळेच भाऊच्या धक्क्यावर बेकायदेशीर विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आज बैठकीत फक्त प्रायोगिकतत्वावर मुख्य प्रवेशद्वार सुरु ठेवण्याची मान्यता दिली आहे. जर मासे विक्रेता भाऊच्या धक्क्यावर मासे विकताना दिसले. तर प्रवेशद्वारे पुन्हा बंद करण्यात येईल, असा इशारा सुद्धा मत्स्य व्यवसाय विभागाने फेरी बोट चालकांना दिला आहे.