मुंबई - मुंबईतील अंधेरी परिसरात सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागली ( Andheri Gas Cylindr Leak ) आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले ( Three Injured Gas Leak Fire ) आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना काल रात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, आगीची घटना साकीनाका येथील जैन सोसायटीत घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. या आगीत तीन जण जखमी झाले आहेत. तर यातील सलीम अन्सारी ( 38 वर्ष ) हा गंभीर भाजला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा - India Corona Update : गेल्या २४ तासांत आढळले 2 लाख 86 हजार नवे रुग्ण; तर दिवसभरात 573 जणांचा मृत्यू