मुंबई - लोअर परेल येथील सुप्रसिद्ध रघुवंशी मिल परिसरात आग लागली आहे. मिलच्या जागी उभारण्यात आलेल्या बी-२ व्यावसायिक इमारतीत आग लागल्याचे समोर आले आहे.
तळ मजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीचे लोट बाहेर येत असल्याचे वृत्त असून या ठिकाणची कार्यालये बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.
![fire in mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7763522_firefinal.jpg)
महापौर किशोरी पेडणेकर यांनी रघुवंशी मिलला भेट दिली आहे. तसेच अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती महापौरांनी दिली.