मुंबई - हार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकाजवळ असलेल्या मार्केटमधील एका दुकानाला पहाटे आग लागली. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून या घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ जनता मार्केट आहे. या मार्केटमधील दुकानाला पहाटे 5.21 वाजता आग लागली. आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच रेल्वे स्थानक व इतर दुकाने असल्याने अग्निशमन दलाने लेव्हल-2 च्या आगीची घोषणा करत 10 अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पाठवली.
तब्बल 2 तास 20 मिनिटानंतर या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. पहाटेची वेळ असल्याने दुकानात कोणी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. याबाबत अधिक माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.