ETV Bharat / city

मुंबईतील कुर्ला साकीनाका जंक्शन येथील मेट्रो हॉटेलला आग

author img

By

Published : Mar 14, 2021, 12:54 PM IST

Updated : Mar 14, 2021, 1:27 PM IST

शहरातील कुर्ला साकीनाका जंक्शन येथील मेट्रो हॉटेलला आज पावणेबारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

fire-broke-out-in-metro-hotel-at-kurla-sakinaka-mumbai
आग

मुंबई - शहरातील कुर्ला साकीनाका जंक्शन येथील मेट्रो हॉटेलला आज पावणेबारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग भीषण नसून अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईतील कुर्ला साकीनाका जंक्शन येथील मेट्रो हॉटेलला आग..

जीवितहानी नाही..

कुर्ला साकिनाका जंक्शन जवळ मेट्रो हॉटेल आहे. या हॉटेलला सकाळी 11.45 च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सदर आग लेव्हल 1 ची म्हणजेच भीषण किंवा मोठी नाही. ही आग छोटी असल्याने आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

हेही वाचा -दैव बलवत्तर म्हणून वाचला चिमुरडा !

Last Updated : Mar 14, 2021, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.