मुंबई - आरेनंतर आता 'नाणार'च्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. नाणार प्रकल्पावरून राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकल्पाला शिवसेनेने कायमच विरोध केला होता. नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या 23 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यानंतर आज आरे कारशेड येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर लगेच नाणार प्रकल्पासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.