ETV Bharat / city

खबरदार! बोगस बियाणे विक्री कराल तर जेलमध्ये जाल - बोगस बियाणे विक्री

राज्यभरात बोगस बियाणे अभियानाचा सुळसुळाट झाला आहे. त्याअनुषंगाने बोगस बियाणे विक्री आणि निर्मिती करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

minister dada bhuse
कृषी मंत्री दादा भुसे
author img

By

Published : Mar 2, 2020, 6:16 PM IST

मुंबई - राज्यभरात बोगस बियाणे अभियानाचा सुळसुळाट झाला आहे. त्याअनुषंगाने बोगस बियाणे विक्री आणि निर्मिती करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक काढणी करण्यासाठी कंबाईंड हार्व्हेस्टींगचा वापर केला होता. यामुळे महाबीज मंडळ व शेतकरी यांना बियाणे पुरवताना अनावधानाने त्यात अगोदर शिल्लक असलेल्या दुसऱ्या सोयाबीन वाणाचे बियाणे मिसळून भेसळ आढळून आल्याचे कृषिमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितले.

दरम्यान, विद्यापीठांना एकत्रित कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील. याचबरोबर खासगी कंपन्या भेसळयुक्त बियाणांचा पुरवठा करत असल्याचे आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

त्यास उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. ते म्हणाले, या प्रकरणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे ३५ टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच ७५ लाख रकमेचे नुकसान ज्यांच्यामुळे झाले त्यांच्याकडून ते वसूल करण्यात येणार असून, सोयाबीन बियाणे एमएयुएस ७१ आणि ६२ यांच्या एकत्रिकरणास जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून बियाणे, किटकनाशके यांची भेसळ होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बियाणांच्या भेसळसंदर्भातील कायदे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येत असून, राज्य शासनास त्याप्रमाणे कारवाई करावी लागते. भेसळीसंदर्भातील तक्रारी आल्यास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती कार्यरत असून, या समितीस आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना देण्यात येतील, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भारत भालके, सुनिल प्रभु, रणजीत कांबळे यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा -

'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देणाऱ्या मानसिक रुग्णाला कर्नाटकमध्ये अटक..

दमदार अ‌ॅक्शनसह 'सूर्यवंशी', 'सिंबा' आणि 'सिंघम'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा ट्रेलर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.