ETV Bharat / city

FIR Against Ranveer Singh : न्यूड फोटो सेशन भोवले! अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Actor Ranveer Singh Nude Photos

अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. रणवीर सिंग यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपहार्य पोस्टमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 292, 293, 509 आणि आयटी ॲक्ट 67 ( ए ) अंतर्गत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल एका सामाजिक कार्यकर्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. ( Actor Ranveer Singh Nude Photo ) ( FIR against actor Ranveer Singh in Mumbai )

अभिनेता रणवीर सिंग
अभिनेता रणवीर सिंग
author img

By

Published : Jul 26, 2022, 12:21 PM IST

Updated : Jul 26, 2022, 3:38 PM IST

मुंबई- अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. रणवीर सिंग यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपहार्य पोस्टमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 292 ,293 , 509 आणि आयटी ॲक्ट 67 ( ए )अंतर्गत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल एका सामाजिक कार्यकर्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. ( Actor Ranveer Singh Nude Photo ) ( FIR against actor Ranveer Singh in Mumbai )

प्रतिक्रिया

अभिनेता रणवीर सिंगने काही दिवासांपूर्वी न्यूड फोटो टाकल्याने खळबळ उडाली ( ranveer singh nude photoshoot ) होती. त्यावरुन त्याच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली होती. तर, काही जणांनी त्याचे समर्थन केलं होते. त्यातच आता रणवीर सिंगविरोधात आता लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ. ललित चांद यांच्यामार्फत वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात यांनी ही तक्रार नोंदवली ( mumbai police complaint filed against Ranveer Singh ) आहे.

भाजप नेते व वकील अखिलेश चौबे यांची पोलिसांत तक्रार-अभिनेता रणवीर सिंग च्या अडचणीत वाढ झाली आहे न्यूड फोटो इंटरनेटवर शेअर केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता सोमवार रोजी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. आता चेंबूर पोलिसांकडून रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रणवीर सिंगच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोवर काही लोकांकडून टिकेची झोड उडाली आहे. तर काही लोक रणवीरचे समर्थ करण्यास मैदानात उतरल्याचे चित्र देखील आहे. रणवीर सिंहच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंद करण्यात आला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. यामुळे न्यूड फोटोशूट करणे रणवीरच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसते आहे.

हेही वाचा - Ranveer Singh : रणवीर सिंगला न्यूड फोटोशूटचं प्रकरण भोवणार?, पोलिसांत तक्रार दाखल

रणवीर सिंहला कायदेशीर नोटीस- न्यूड फोटो इंटरनेटवर शेअर केल्या प्रकरणी ऍडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर यांनी रणवीर सिंह यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या सर्व पोस्ट तीन दिवसात डिलीट करण्यात यावे असे रणवीर सिंहला पाठवलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे. याच पोस्ट प्रकरणात आज चेंबूर पोलीस स्टेशनमध्येदेखील रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे रणवीर सिंह यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. रणवीर सिंह हा मोठा कलाकार असून त्याचे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. अशाप्रकारे पोस्ट केल्याने तरुण पिढी वाईट दिशेने जाऊ शकते. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या रणवीर सिंहने या सर्व पोस्ट डिलीट केल्या पाहिजे असे नोटीसमध्ये म्हटले आहे. जर रणवीर सिंहने हे पोस्ट डिलीट केली नाही तर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूडमधील काही लोक रणवीर सिंहच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. मात्र समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीरला न्यूड फोटोशूटवरून टार्गेट केले. अबू आझमी म्हणाले होते की रणवीरचा नंगानाच सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी नग्न फिरणे कायद्याने गुन्हाच आहे. बॉलिवूडमधून अनेकांनी म्हटले होते की त्याने काय करावं आणि काय न करावं हे सांगणारे आपण कोण? हा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र आता हे न्यूड फोटोशूटचे प्रकरण थेट पोलिसात पोहचल्याने रणवीरवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पेपर मॅगझिनसाठी रणवीर सिंगने केले फोटो सेशन- एका पेपर मॅगझिनसाठी रणवीर सिंगने हे फोटो सेशन केले होते. 'डाइट सब्या' नावाच्या एका अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने रणवीर सिंगचे हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. रणवीर सिंगने या पेपर मॅगझिनच्या माध्यामातून बर्ट रेनॉल्ड्सला श्रद्धांजली म्हणून इंटरनेट ब्रेक केल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट आणि फॅशनबद्दलही सांगितले. जेव्हापासून हे फोटो बाहेर आले तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या आनंददायी प्रतिक्रिया आहेत, तर काहींच्या मिश्कील प्रतिक्रिया आल्या आहेत.

हेही वाचा - रणवीर-आलियाच्या 'प्रेमकहानी'त धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीची एन्ट्री

अबू आझमींनी केली होती टीका - रणवीर सिंहचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित केली होती. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

'या' कलमांखाली गुन्हा दाखल - चेंबूर पोलीस ठाण्यात महिलांच्या भावना दुखावल्याप्रकरणी एका ललित चांद यांच्या स्वयंसेवी संस्थेने रणवीर विरोधात तक्रार दाखल केली आहे. रणवीर विरोधात आयपीसी आणि आयटी कायद्याच्या कलम २९२,२९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

कोणताही दिखावा करत नाही-अर्जुन कपूरला विचारण्यात आले की, रणवीर सिंगचे फोटोशूटकडे तो कसा पाहतो? त्याला उत्तर देताना तो म्हणाला, 'मला जेवढे माहित आहे... रणवीर सिंगमध्ये कोणताही दिखावा करत नाही. तुम्ही 11-12 वर्षांपासून रणवीरला पाहत आहात. तो जे काही करतो तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो. त्याने जे काही केले ती त्याची निवड आहे, त्याला जे सोयीस्कर वाटते तेच तो करतो आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.

Last Updated : Jul 26, 2022, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.