ETV Bharat / city

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात एफआयआर - नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात एफआयआर

भाजप नेते मोहीत कंबोज (Mohit Kamboj) यांनी नवाब मलिकांच्या अटकनंतर तलवार दाखवली आणि हेच प्रकरण त्यांना महागात पडले आहे. कारण या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोहीत कंबोज यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आहे. (FIR against BJP leader Mohit Kamboj) मुंबई पोलिसांनी कंबोज यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. कोविड नियमांच्या उल्लंघनासह शस्त्रास्त्र कायद्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात एफआयआर

author img

By

Published : Feb 24, 2022, 8:06 AM IST

मुंबई - मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पु्न्हा आमनेसामने आले आहेत. महाविकास आघाडी नवाब मलिक यांचा राजीनामाही घेण्याची शक्यता आहे. मात्र आज एकट्या नवाब मलिक यांच्याच अडचणीत वाढ झाली नाही. तर एका भाजप नेत्यांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली. भाजप नेते मोहीत कंबोज (Mohit Kamboj) यांनी नवाब मलिकांच्या अटकनंतर तलवार दाखवली आणि हेच प्रकरण त्यांना महागात पडले आहे. कारण या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोहीत कंबोज यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आहे. मुंबई पोलिसांनी कंबोज यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. कोविड नियमांच्या उल्लंघनासह शस्त्रास्त्र कायद्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मलिकांच्या अटकेनंतर राज्यभर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला

एखाद्या नेत्याने अशी तलवार दाखवणे महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित ही पहिलीच वेळ असेल. मात्र, हा तलवार दाखवण्याचा प्रकार त्यांना आणखी किती महागात पडणार हे पोलिसांच्या कारवाईनंतरच कळेल. मलिकांच्या अटकेनंतर राज्यभर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी मोहीत कंबोजही कार्यकर्त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भावनांना आवर न घालता थेट घोषणाबाजी करत तलवार उपसली. मात्र, याची तात्काळ दखल मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मात्र या अटकेविरोधात राज्यभर आंदोलन केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंबोज वादात

गेल्या अनेक दिवसांपासून मोहीत कंबोज हे नाव चर्चेत आहे. सर्वात आधी संजय राऊतांनी मोहीत कंबोज यांचे नाव थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीसांशी जोडले. त्यानंतर मोहीत कंबोज यांनीही राऊतांवर जोरदार पलटावार केला. राऊत आणि मलिकांवर टीका करताना मोहीत कंबोज सलीम जावेदची जोडी असे करायचे. त्यामुळे मोहीत कंबोज हे जास्तच फोकसमध्ये आले आहेत. आता मुंबई पोलीस या प्रकरणात त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यात त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.