मुंबई - चित्रपट निर्माते संदीप सिंग यांना ( Sandeep Singh received threat ) फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या ( Sidhu Moose Wala murder )हत्येच्या धर्तीवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात अल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. चित्रपट निर्माते संदीप सिंह यांना बुधवारी फेसबुकवर धमकी देण्यात आली. कृष्णा सिंह राजपूत या फेसबुक खात्यावरून संदीप सिंह यांना धमकी आली आहे. आरोपीने त्यात लिहले आहे की, ‘चिंता मत करना, मुसावाला को गोली मारी गयी है. उसी तरहा तुझे भी मारा जाएगा, वेट कर और याद रख’, अशी धमकी सिंह यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी धमकी देणाऱ्या फेसबुक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-
Maharashtra | Film producer Sandeep Singh received a death threat on Facebook. He filed a case at the local PS in Mumbai. The threat said of killing him on the lines of the murder of Punjabi Singer Sidhu Moose Wala. Case filed, prober underway: Mumbai Police
— ANI (@ANI) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Film producer Sandeep Singh received a death threat on Facebook. He filed a case at the local PS in Mumbai. The threat said of killing him on the lines of the murder of Punjabi Singer Sidhu Moose Wala. Case filed, prober underway: Mumbai Police
— ANI (@ANI) July 7, 2022Maharashtra | Film producer Sandeep Singh received a death threat on Facebook. He filed a case at the local PS in Mumbai. The threat said of killing him on the lines of the murder of Punjabi Singer Sidhu Moose Wala. Case filed, prober underway: Mumbai Police
— ANI (@ANI) July 7, 2022
हेही वाचा - Abu Azmi Threat : अबू आझमींना धमकी देणाऱ्या युवकाला पुण्यातून अटक
अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवर राहणारे सिंग यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून धमकीची तक्रार दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी एफआयआर नोंदवला. सिंग यांचे प्रवक्ते दीपक साहू यांनी सांगितले की, ज्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्याला ओळखत सिंह नाही. “आम्ही ही धमकीची गंभीर दखल घेतली घेतली असून पोलिस तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत,” अशी माहिती दीपक साहू यांनी दिली आहे.
सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल - सूत्रांनी सांगितले की. निर्मात्याने वादग्रस्त विषयांवर चित्रपट बनवल्यापासून, अशी धमक्या त्यांना मिळण्याचे कारण असू शकते. सिंगचा यांचा पुढचा चित्रपट 'स्वतंत्र वीर सावरकर' पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. या संर्दभात आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे म्हणाले, “आम्ही निर्माता संदीप सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून फेसबुक वापरकर्त्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. धमकी देण्यामागे काय हेतू आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही सेवा प्रदात्याकडून तपशील मागवला आहे तसेच गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेत आहोत.”
दरम्यान, या आगोदर अभिनेते सलमान खान यांनाही पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई यांची चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानचे वकिल यांनाही धमकी मिळाली होती. मूसेवाला यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे धमकी सत्र सुरू झाले आहे.
-
Actor Salman Khan's lawyer H Saraswat receives death threat, will meet Sidhu Moosewala's fate, says letter
— ANI Digital (@ani_digital) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/zVmQ34oMD3#SalmanKhan #SidhuMoosewala #threatletter pic.twitter.com/6cVnC8ybCZ
">Actor Salman Khan's lawyer H Saraswat receives death threat, will meet Sidhu Moosewala's fate, says letter
— ANI Digital (@ani_digital) July 7, 2022
Read @ANI Story | https://t.co/zVmQ34oMD3#SalmanKhan #SidhuMoosewala #threatletter pic.twitter.com/6cVnC8ybCZActor Salman Khan's lawyer H Saraswat receives death threat, will meet Sidhu Moosewala's fate, says letter
— ANI Digital (@ani_digital) July 7, 2022
Read @ANI Story | https://t.co/zVmQ34oMD3#SalmanKhan #SidhuMoosewala #threatletter pic.twitter.com/6cVnC8ybCZ
हेही वाचा - Heavy Rain In Mumbai: पावसाचा दणका! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, २४ तासात ३ जखमी, वेगवान वारे वाहणार