मुंबई- कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौहर खान कोरोना पॉझिटिव्ह असतानाही, तिने चित्रिकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असतानाही चित्रिकरण
दरम्यान याबाबत मुंबई महापालिकेच्या वतीने देखील एक ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुंबईमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षीततेशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अभिनेत्री गौहर खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौहर खान कोरोना पॉझिटिव्ह होत्या, त्यांना होम आसोलेशनमध्ये राहाण्यास सांगण्यात आले होते. मात्र तरीदेखील त्यांनी चित्रिकरण केल्याने, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.