ETV Bharat / city

मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार - dindoshi police station

रेमडेसिवीर इंजेक्शन वरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

file immediate case against nawab malik
file immediate case against nawab malik
author img

By

Published : Apr 19, 2021, 5:52 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली आणि खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. या प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरवल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अतुल भातखळकर यांनी तक्रारीत म्हटले की, दोन दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये, अन्यथा आपला परवाना रद्द करू अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती देऊन केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण केला. तसेच राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर प्रसार माध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले.

हे ही वाचा - महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा - पियुष गोयल

यामुळे भयभीत होऊन हजारो लोक महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात झाली. रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, 1897 नुसार गुन्हा असल्यामुळे नवाब मलिक यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

राज्य सरकारने पुढील 48 तासांत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.