मुंबई - मुंबईत मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी 1360, सोमवारी 1008, मंगळवारी 1012, बुधवारी 1539 तर आज 1508 रुग्ण आढळून आले आहेत. आज 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 1508 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 38 हजार 631 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 515
वर पोहचला आहे. 911 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 14 हजार 257 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 11 हजार 969 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 205 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 27 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 228 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 34 लाख 96 हजार 145 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1167, 25 फेब्रुवारीला 1145, 26 फेब्रुवारीला 1034, 27 फेब्रुवारीला 987, 28 फेब्रुवारीला 1051, 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1121, 4 मार्चला 1103, 5 मार्चला 1173, 6 मार्च 1188, 7 मार्चला 1360, 8 मार्चला 1008, 9 मार्चला 1012, 10 मार्चला 1539, 11 मार्चला 1508 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा- 'नेत्यांच्या सभा, अधिवेशन पार पडते मग एमपीएससी परीक्षा घेण्यास काय अडचण?'