मुंबई - खाद्यतेलातून होणाऱ्या भेसळीचा पर्दाफाश एफडीएने केले आहे. मुंबई महानगर प्रदेशात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री सुरुच आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने १६ मार्चला (एफडीए) वसईतील खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या दोन कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत ३2 लाख 50 हजार 567 रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएने टाकलेल्या छाप्यात मे. ओमकार ट्रेडिंग कंपनी आणि मे शिवम ट्रेडिंग कंपनीत अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले. सर्वात गंभीर बाब म्हणजे येथे राजरोसपणे खाद्यतेलात भेसळ केली जात होती. खाद्यतेलाच्या पॅकिंगसाठी वापरलेल्या टीनचा पुनर्वापर केला जात असल्याचे दिसून आले. तर निश्चित वजनापेक्षा कमी खाद्यतेल टीनमध्ये भरले जात असल्याचेही यावेळी दिसून आले. भेसळयुक्त तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा-'भारतीय रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नाही'
'या' कंपनीवर छापा-
अन्न भेसळीविरोधात एफडीएकडून सातत्याने कारवाई सुरुच असते. अशात गेल्या काही महिन्यात खाद्यतेलामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एफडीएने याआधीही कोट्यवधींचा साठा जप्त केला आहे. तर याच कारवाईचा भाग म्हणून सोमवारी वसईत एफडीएने कारवाई केली. यावेळी टीनचा पुनर्वापर केला जात होता. तसेच काही पिशव्यांमध्ये वजनापेक्षा कमी तेल असल्याचेही दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आले.
हेही वाचा-हिरोच्या ५० हजार इलेक्ट्रिक वाहनांची वर्षभरात विक्री
काही संशयास्पद आढळल्यास एफडीएला कळवा-
खाद्यतेलाविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. त्याचवेळी नागरिकांना खाद्यतेलात वा इतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे आढळल्यास एफडीएच्या 1800222365 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.