ETV Bharat / city

राज्यात 'रेमडेसीवीर'चा काळाबाजार नव्हे तुटवडा - एफडीए आयुक्तांचा दावा - एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे न्यूज

गेल्या 10 दिवसांपासून राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एफडीए गंभीरपणे लक्ष देत नसल्याने काळाबाजार सुरू असल्याचा आरोप होत आहे. पण एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

रेमडेसीवीर
रेमडेसीवीर
author img

By

Published : Jul 10, 2020, 6:02 PM IST

मुंबई - कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्रभावी असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा आहे. अशा स्थितीत इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा विविध संघटनाकडून आरोप होत आहे. असे असले तरी अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त अरुण उन्हाळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा दावा फेटाळला आहे. मात्र, मुंबई व राज्यात मागणीच्या तुलनेत रेमडेसीवीरचा पुरवठा कमी होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

गेल्या 10 दिवसांपासून राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एफडीए गंभीरपणे लक्ष देत नसल्याने काळाबाजार सुरू असल्याचा आरोप होत आहे. पण एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मुळात गंभीर रूग्ण अधिक असल्याने इंजेक्शनची मागणी अधिक आहे. तर त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे रेमडेसीवीरचा तुडवडा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

एफडीएचे सर्व अधिकारी इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या वितरक, रुग्णालये या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. अद्याप आम्हाला कुठेही काळाबाजार झाल्याचे निदर्शनास आलेले नसल्याचे उन्हाळे यांनी सांगितले. तसेच एकही तक्रार आली नसल्याची त्यांनी माहिती दिली आहे. रेमेडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता वाढावी, यासाठी कंपन्यांकडे अधिक साठ्याची मागणी केली आहे.

इंजेक्शनची वाढली मागणी; दुप्पट दराने रुग्णांच्या नातेवाईकांकडून खरेदी

अनेक कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी भटकावे लागत आहे. दामदुप्पट भावाने रुग्णाच्या नातेवाईकांना रेमेडेसीवीर इंजेक्शन घ्यावे लागत असताना एफडीएकडून काळाबाजार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यावर काही संघटनानी नाराजी व्यक्त केली आहे. गंभीर आणि अतिदक्षतामध्ये असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्ल्यूवरील रेमडेसीवीर इंजेक्शन दिले आहे. हे इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याने त्याची मागणी वाढली आहे.त्याचवेळी एका रुग्णाला 5 हजार 400 रुपयांचे एक अशी 6 इंजेक्शन द्यावी लागत आहेत. काही दिवसांपूर्वी हे इंजेक्शन देशात तयार होत नव्हते. त्यामुळे हे इंजेक्शन देशात मिळत नव्हते. पण आता देशात हिट्रो आणि सिप्ला कंपनीला रेमडेसीवीरच्या उत्पादनासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार इंजेक्शनचा साठा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे गंभीर रूग्ण राज्यात अधिक असल्याने इंजेक्शनची मागणी वाढली आहे.

एफडीएवर दुर्लक्षाचा आऱोप

एफडीएच्या दाव्यावर ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गंभीर परिस्थिती असताना जबाबदारी टाळत एफडीए दावा कसा करू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर एफडीएच्या दुर्लक्षामुळेच काळाबाजार करणाऱ्यांचे फावत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी काळाबाजारावर लक्ष ठेवले, तर नक्कीच हा प्रश्न सुटेल, असे मत पांडे यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.