ETV Bharat / city

Fake Vaccination Case : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौकशीसाठी एसआयटी स्थापन

बोगस लसीकरण शिबिराची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता यात मुख्य आरोपी महेंद्रप्रताप सिंग आरोपी मनीष त्रिपाठी यांची बँक खाते गोठविण्यात आलेली आहेत. गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या लसींचा पुरवठा हा शिवम हॉस्पिटल, येथून असल्याने शिवम हॉस्पिटलचे डॉ. शिवराज पटारिया व निता पटारिया यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे. या गुन्ह्यात लस घेतलेल्या एकूण २०० व्यक्तींचे जबाबांची नोंद करण्यात आले आहे.

नागरे पाटील
नागरे पाटील
author img

By

Published : Jun 25, 2021, 4:45 PM IST

Updated : Jun 25, 2021, 5:02 PM IST

मुंबई - बोगस कोरोना लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामध्ये कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, ठाणे आणि खारमध्येही बनावट लसीकरण शिबीर झाल्याचे उघडकीस आले असून सात ठिकाणी गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत दहा आरोपीना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यांची व्याप्ती पाहता सखोल चौकशीसाठी एसआयटी स्थापन केल्याची माहिती मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज (शनिवार) आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

विश्वास नांगरे पाटील

असा झाला बोगस लसीकरणाचा पर्दाफाश -

कोरोना लसीकरणाचे पहिले बोगस शिबीर ३० मे २०२१ रोजी कांदिवली पश्चिम येथे हिरानंदानी हेरिटेज क्लब हाऊसमध्ये आयोजित करण्यात आले होते. या सोसायटीतील ३९० नागरिकांना १ हजार २६० रूपये प्रति दराने लस देण्यात आली होती. लसीकरण झाल्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी प्रमाणपत्राबाबत मागणी केली असता शिबीर आयोजकांनी लस घेतलेल्या नागरिकांना डाटा मागणी केला व त्याप्रमाणे सदस्यांना विविध रुग्णालय व कोविड सेंटर या संस्थेचे लस घेतल्याबाबत प्रमाणपत्र कोविन अँपवर देण्यात आले. मात्र, या प्रमाणापत्रात तफावत होती. याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी तपास केले असता लसीकरण बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या प्रकरणात डॉक्टर पती-पत्नीसह ८ आरोपींना केली अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रूपये जप्त आहे. आरोपीने इसमांनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लसी पुरविण्याकरिता गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

शिवम हॉस्पिटलमधून पुरवठा -

या बोगस लसीकरण शिबीराची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता यात मुख्य आरोपी महेंद्रप्रताप सिंग आरोपी मनीष त्रिपाठी यांची बँक खाते गोठविण्यात आलेली आहेत. गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या लसींचा पुरवठा हा शिवम हॉस्पिटल, येथून असल्याने शिवम हॉस्पिटलचे डॉ. शिवराज पटारिया व निता पटारिया यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे. या गुन्ह्यात लस घेतलेल्या एकूण २०० व्यक्तींचे जबाबांची नोंद करण्यात आले आहे. गुन्ह्यात कोविन अॅपवर अपलोड केलेले एकूण ११४ बनावट प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचे दुवे प्राप्त करून अधिक तपास सुरू आहे. कांदिवली पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये एकूण १० आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

अटक आरोपींची नावे-

महेद्र प्रताप सिंग, संजय विजय गुप्ता, चंदन रामसागर सिंह, नितीन वसंत मोर्डे, मोहम्मद करीम अकबर, गुडीया रामबली यादव, शिवराज छोटुलाल पटारिया, निता शिवराज पटारिया, श्रीकांत निवृत्ती माने आणि सिमा राजेश अहुजा असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहे. या आरोपी विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा तसेच फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञनुसार गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर बनावट औषधांसंदर्भातले गुन्हे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गतही गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

एका महिन्यात ७ ठिकाणी बोगस लसीकरण -

२५ मे २०२१ ते ६ जून २०२१ या कालावधीत कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली, भोईवाडा, बांगुरनगर अशा सात ठिकाणी बोगस लसीकरण झाले आहे. या सातही ठिकाणी गुन्हे दाखल केले असून समतानगर आणि अंधेरीतही असे प्रकार उघडकीस आले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोरिवलीच्या आदित्य कॉलेजमध्ये एकूण २२५ तर मानसी शेअर्स अॅण्ड स्टॉकमध्ये ५१४ नागरिकांचे बोगस लसीकरण करण्यात आले. परेलच्या पोद्दार एज्युकेशनर सेंटरमध्ये २०७ जणांना लसीकरण करण्यात आले. तर वर्सोवा येथे टिप्स कंपनीमध्ये १५१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. टिप्स कंपनी, खार, मुंबई येथे २०६ जणाचे लसीकरण करण्यात आले. बांगुर नगर पोलीस ठाणे अंतर्गत बँक ऑफ बडोदा, बॅच लिंक रोड, मालाड पश्चिम मुंबई येथे ४० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांतर्फे आवाहन-

एकंदरीत झालेल्या तपासामध्ये मुंबई शहरात अनधिकृत रित्या शासनाच्या धोरणांकडे दुर्लक्ष करून विविध शैक्षणिक संस्था, निवासी इमारती, औद्योगिक संस्था व इतर ठिकाणी या गुन्ह्यातील कार्यपध्दतीप्रमाणे लसीकरण झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते, की असे अनधिकृत लसीकरण आपल्या निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलिसांना माहिती देण्यात यावी, तसेच नागरिकांनी शासनाने नेमून दिलेल्या धोरणांनुसार नियमावलीनुसार लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा -Fake vaccination case - शिवम रुग्णालयाचे मालक मलिक दाम्पत्याला अटक

Last Updated : Jun 25, 2021, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.