ETV Bharat / city

Fadnavis Shinde Government : राज्यात फडणवीस शिंदे सरकार ; नव्या सरकारमध्ये या नेत्यांना स्थान - girish mahajan

राज्यात फडणवीस शिंदे यांचे सरकार लवकरच स्थापन होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाजप आणि शिंदे गट बहुमताचा ठराव राज्यपालांकडे ( governor bhagat singh koshyari ) लवकरच सुपूर्त करतील अशी चर्चा आहे. एक तारखेला शपथविधीचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सध्याच्या घडीला भाजपाच्या वतीने नव्या मंत्रिमंडळात 28 ते 30 मंत्रांचा समावेश असेल तर शिवसेनेच्या शिंदे गटाला बारा ते चौदा मंत्री पदे देण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

fadnavis shinde
फडणवीस शिंदे
author img

By

Published : Jun 30, 2022, 1:40 PM IST

Updated : Jun 30, 2022, 1:50 PM IST

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकार कोसळल्यानंतर आता राज्यात फडणवीस शिंदे यांचे सरकार ( Fadnavis Shinde Government ) लवकरच स्थापन होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाजप आणि शिंदे गट बहुमताचा ठराव राज्यपालांकडे लवकरच सुपूर्त करतील अशी चर्चा आहे. एक तारखेला शपथविधीचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सध्याच्या घडीला भाजपाच्यावतीने नव्या मंत्रिमंडळात 28 ते 30 मंत्रांचा समावेश ( BJP's 28 to 30 ministers in new cabinet )असेल तर शिवसेनेच्या शिंदे गटाला बारा ते चौदा मंत्री पदे देण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात ( Discussions of posts in final stage ) आहे. या संदर्भात स्वीट करत अद्याप कोणतीही यादी आम्ही तयार केलेली नाही चर्चा करत आहोत असे जरी एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात मात्र नावांवर चर्चा सुरू असून यातील नावे नक्की अंतिम होतील अशी माहिती हाती आली आहे. या मंत्रिमंडळामध्ये राज्यातील सर्व प्रांतांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न असणार आहे त्याच सोबत काही विशिष्ट समाजातील नेत्यांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. पक्षातील जुन्या जाणत्या आणि मातब्बर नेत्यांनाही सामावून घेतले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी ( Fadnavis likely to be Chief Minister ) तर एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता ( Eknath Shinde likely to be Deputy Chief Minister ) आहे. एकूणच पक्षाची अंतिम होत असलेली यादी नेमकी काय आहे आणि कोणाला मंत्रीपदे मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे हे आपण पाहूया.

हेही वाचा - BJP Will Claim Power: भाजप करणार सत्तेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता

भाजपच्यावतीने मंत्रिपदे - देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार ( sudhir mungantiwar ) , चंद्रकांत पाटील ( chandrakant patil ), गिरीश महाजन ( girish mahajan) यांसारख्या मातब्बर नेत्यांसह मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचसोबत राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजीत सिंह पाटील, संजय कुटे, जयकुमार रावल, सुरेश खाडे, जयकुमार गोरे, देवयानी फरांदे, अशोक उईके, परिणय फुके, रणधीर सावरकर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विनय कोरे आणि राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्यमंत्री पदाची संधी - गोपीचंद पडळकर, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, नितेश राणे, निलय नाईक, राहुल कुल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून यांना संधी - एकनाथ शिंदे उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील शंभुराज देसाई बच्चू कडू दीपक केसरकर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

तर राज्यमंत्री म्हणून - संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. एकूणच राज्यातील सर्व महसूल विभागांना आणि सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा आणि मंडळाचा चेहरा सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न फडणवीस शिंदे यांच्याकडून करण्यात येत असल्याचे या यादीवरून दिसून येते.

भाजने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या नंतर दुसरीकडे बंडखोर आमदारांनी गुवाहाटीवरुन गोवा गाठले आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. समर्थक आमदारांच्या सहिचे पत्र घेऊन ते निघाल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील आणि बंडखोर आमदारांचे भापला समर्थन असल्याचे पत्र देतील त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करतील. रात्री राजभवन गाठून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सादर केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गटात आनंदोत्सव पहायला मिळाला.

उद्या शपथविधी होण्याची शक्यता : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळल्यानंतर, मी पुन्हा येईन असे सांगणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आता थोडा अवधी शिल्लक राहिलेला आहे. उद्या सायंकाळी शपथविधी होणार असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. 1 जुलैला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडेल. मात्र त्यांच्या सोबत अजून आठ ते दहा मंत्री पहिल्यांदा शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. भारतीय जनता पक्षाकडून पाच ते सहा मंत्री, तर एकनाथ शिंदेच्या गटाकडून चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. नागपूर नैऋत्य विधानसभा मतदार संघाचे ते नेतृत्व करतात. 2014 च्या विधान सभा निवडणुकीत त्यांनी युतीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जबाबदारी सांभाळली होती. 2019 च्या विधान सभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरीही युती तुटल्याने त्यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली होती. 2019 ला महाविकास आघाडी स्थापन होऊन सेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडली. त्यामुळे मी पुन्हा येईन! अशी घोषणा देणारे फडणवीस हे मुख्यमंत्री पदापासून दूर राहिले. परंतु आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे भाजप पुन्हा सत्तेत येण्याची आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 34 वर्षांनी राज्य सरकारने मंजूर केला 'संभाजीनगर'चा प्रस्ताव, आता नामांतराचा चेंडू केंद्राकडे

Last Updated : Jun 30, 2022, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.