ETV Bharat / city

Fadanvis as Chanakya of Maharashtra politics : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे चाणक्य

author img

By

Published : Jun 21, 2022, 2:47 PM IST

Updated : Jun 21, 2022, 5:05 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होऊ घातला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवित नाही तोच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला खिंडार पाडण्याची खेळी रात्रीतून खेळली. एकनाथ शिंदे 25 हून अधिक आमदारांसह भाजपाच्या वाटेवर जाण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का आणि आता उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठीची मोठी खेळी, या सर्वांमागे एकच नाव येते आहे ते म्हणजे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस. बुद्धीबळाच्या पटाप्रमाणे राजकीय पटलावर त्यांनी अशा काही खेळी केल्या की, महाविकास आघाडीच्या धुरंदरांना काही कळायच्या आतच त्यांचा डोलारा कोसळत असल्याचे दिसू लागले. महाराष्ट्राचा नवा चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वच जण पाहू लागले.

Fadanvis
Fadanvis

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होऊ घातला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवित नाही तोच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला खिंडार पाडण्याची खेळी रात्रीतून खेळली. एकनाथ शिंदे 25 हून अधिक आमदारांसह भाजपाच्या वाटेवर जाण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का आणि आता उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठीची मोठी खेळी, या सर्वांमागे एकच नाव येते आहे ते म्हणजे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस. बुद्धीबळाच्या पटाप्रमाणे राजकीय पटलावर त्यांनी अशा काही खेळी केल्या की, महाविकास आघाडीच्या धुरंदरांना काही कळायच्या आतच त्यांचा डोलारा कोसळत असल्याचे दिसू लागले. महाराष्ट्राचा नवा चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वच जण पाहू लागले.

चाणक्य देवेंद्र फडणवीस - 2019 च्या निवडणुकीत मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य प्रचंड गाजले. त्याप्रमाणे त्यांनी निवडणुकीत मोठे यशही मिळविले होते. भाजपचे 105 आमदार त्यांनी निवडून आणले. त्यासोबत युतीमध्ये असलेल्या शिवसेनेचे 56 आमदार होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीचे सरकार स्थापन होणार अशी स्थिती होती, पण शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून राहिली. राजकारणातील धुरंदर नेते असलेल्या शरद पवार यांनी हीच संधी साधत काँग्रेसलाही सोबत घेत शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना देत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना मात दिली. ही मात दिली त्याआधीच एक दिवस आधी त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या खेळीत शरद पवार यांनी आपणच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य असल्याचे सिद्ध केले होते. तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या उरात हे शल्य राहिले होते आणि त्यादिवसापासूनच त्यांनी आपला राजकीय बुद्धीबळाचा पट मांडण्यास सुरुवात केली होती.

चाल क्रमांक 01 मुंबई महापिलेकत जोर - 2019 ला शिवसेनेने दगाबाजी करून राज्यात सरकार बनविल्याचे दुःख देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच बोचले होते. विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच मुंबई महापालिका निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपाने आपली शक्ती पणाला लावली. शिवसेनेला थेट आव्हान दिले. प्रचंड जोर लावल्याने भाजपाचे मुंबई महापालिकेत प्रथमच 82 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेला भाजपपेक्षा थोड्याच जास्त जागा मिळाल्या, परंतु बहुमत कोणालाही मिळाले नव्हते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे शिवसेनेच्या मदतीला धावून गेले. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि सेनेची मुंबई महापालिकेत सत्ता येऊ शकली. भाजपा सत्ता मिळवू शकली नसली तरी आपली ताकद प्रचंड वाढल्याचे दाखवून देत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या छातीत धडकी भरवली होती.

चाल क्रमांक 02 बदनामीचा अजेंडा - देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नंतर भाजपाने या सरकारच्या बदनामीचा अजेंडा राबविला. राज्यभरात वेगवेगळ्या मुद्यावर सरकार कसे निष्प्रभ आहे हे सातत्याने सांगितले जात होते. जनतेची कामे न करता भ्रष्टाचारावरच या सरकारचा भर असल्याचे सांगितले गेले. राज्यभरात एकाचवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक आणि राज्यस्तरावरील मुद्दे उचलत भाजपाने सरकारच्या विरोधात राळ उठविली. यामुळे राज्यभर सरकारविरोधी वातावरण बनत गेले.

चाल क्रमांक 03 अधिवेशनात आक्रमक - देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळ अधिवेशनांचा दांडगा अनुभव होता आणि दुसरीकडे कोणताही अनुभव नसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून समोर होते. फडणविसांनी हीच गोष्ट संधी म्हणून हेरली आणि विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारवर वेगवेगळ्या मुद्यांवर जोरदार हल्ले केले. मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या संशयास्पद कारचे प्रकरण गाजत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचाच या प्रकरणात हात कसा आहे हे अधिवेशनात उघड करून बॉम्बगोळा टाकला. मुंबई पोलिस अधिकारी वाझे त्यात असल्याचे त्यांनी सप्रमाण सांगितले. पुढे 100 कोटींच्या खंडणीचे प्रकरण काढले गेले. फडणवीस एकापाठोपाठ एक हल्ले करीत गेले. या सर्व प्रकारात ठाकरे सरकारने अधिवेशनच कमीत कमी दिवसांचे करून टाकले. हीच त्यांची हार होती आणि फडणविसांची जीत.

चाल क्रमांक 04 स्थानिक प्रश्नांवरून रान उठविले - औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अनेकदा घेरले. देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वात औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून प्रचंड मोर्चा काढण्यात आला. 30 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत सत्तेत अससेली शिवसेना या मोर्चाने हादरून गेली. मुख्यमंत्र्यांना भर सभेत पाणी प्रश्नावर उत्तर द्यावे लागले, पण तेही समाधानकारक नव्हते. फडणविसांना औरंगाबादसाठी दिलेल्या 1680 कोटींच्या नव्या पाणी योजनेला दिलेल्या स्थगितीवरूनही फडणविसांनी प्रश्नांची सरबत्ती करीत ठाकरेंना निरुत्तर केले होते.

चाल क्रमांक 05 अनिल देशमुख, नवाब मलिक इडीच्या जाळ्यात - देवेंद्र फडणविसांचा पुढचे टार्गेट होते ते महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणे. यातच त्यांनी पहिला बॉम्बगोळा टाकला तो अनिल देशमुख यांच्यावर. मुंबई पोलिसांमार्फत महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचा मोठा आरोप करण्यात आला. मुंबई पोलिसांतील अधिकारी सचिन वाझेंवरही त्यात आरोप झाले. या प्रकरणात देशमुख पुरते अडकले आणि अखेर त्यांना इडीच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. ते आजतागायत अटकेत आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी आर्थिक हितसंबंधाचे आरोप झाले आणि ते देखील यात अडकले. नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत. या सर्व प्रकरणांमुळे आघाडी सरकारची पुरती बदनामी झाली.

चाल क्रमांक 06 राज्यपाल नियुक्त सदस्यांचा प्रश्न - राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा अखेरपर्यंत भाजपाने पूर्ण होऊच दिला नाही. महाविकास आघाडीने अनेकदा राज्यपालांना यादी देऊन या आमदारांची नियुक्ती करण्याची विनंती केली, पण अखेरपर्यंत राज्यपालांनी ती मंजूर केली नाही. या खेळीमागेही देवेंद्र फडणवीस असल्याचे बोलले जाते. याशिवाय सातत्याने वेगवेगेळे प्रश्न घेऊन भाजप नेते राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकारच्या तक्रारी करीत राहिले. त्यामुळे सरकार कायम अस्थिरतेच्या वाटेवर रहात होते.

चाल क्रमांक 07 राज्यसभा, विधान परिषदेतील चाणक्य निती - देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनितीने राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही पाच उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला हादरा दिला. आघाडीची तब्बल 21 मते फुटली. शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मते फुटली. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 3 आणि घटक पक्षांची 9 अशी 12 मते फुटली. तर काँग्रेसचे देखील 3 आमदार फुटले. याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला त्याचवेळी महाविकास अघाडी आणि विशेषत: शिवसेनेत सर्वकाही अलबेल नाही हे स्पष्ट झाले होते.

चाल क्रमांक 08 चाणक्याचा अखेरचा वार - महाविकास आघाडी सरकार पाडणे हेच ध्येय घेऊन फडणवीस कार्यरत राहिले. विधान परिषदेचे निकाल लागत नाही तोच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या रुपाने ठाकरे सरकारला हादरा दिला. शिंदे शिवसेनेचा मोठा गट फोडून जाण्याच्या तयारीत आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत आणि तिथून ते सगळ्या चाली आता खेळत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य ठरलेल्या देवेंद्र फडणविसांची ही अखेरची चाल होती, असे म्हणायला हवे.

हेही वाचा - Eknath Shinde : नाराज मंत्री एकनाथ शिंदे सुरतमध्ये.. गुजरात भाजप अध्यक्षांच्या संपर्कात

Last Updated : Jun 21, 2022, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.