ETV Bharat / city

म्हाडा सोडतीमधील विजेत्यांना पैसे भरण्यास मुदतवाढ - विलंब शुल्क आकारणी

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात आलेल्या सोडतीमधील विजेत्यांना घराचे पैसे भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुतदवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या लाभार्थ्यांना जानेवारी, 2020 ते जून, 2021 या कालावधीत तात्पुरते करपत्र देण्यात आले, अशा विजेत्यांना मंडळाने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार विजेत्यांना 16 जानेवारीपर्यंत पैसे भरता येणार आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Dec 7, 2021, 12:18 AM IST

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात आलेल्या सोडतीमधील विजेत्यांना घराचे पैसे भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुतदवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या लाभार्थ्यांना जानेवारी, 2020 ते जून, 2021 या कालावधीत तात्पुरते करपत्र देण्यात आले, अशा विजेत्यांना मंडळाने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार विजेत्यांना 16 जानेवारीपर्यंत पैसे भरता येणार आहे.

मुंबई मंडळाने दोन वर्षांपूर्वी विविध वसाहतीतील घरांची सोडत काढली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अर्जदारांना सदनिकेचे किंमत भरण्यात अडचण निर्माण झाली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी मंडळाच्या काही सदनिका ताब्यात घेतल्या. त्यामुळे म्हाडाने जानेवारी, 2020 ते जून, 2021 या कालावधीत तात्पुरते करपत्र दिलेल्या विजेत्यांना विलंब शुल्क आकारणी करण्याच्या नियमानुसार 18 ऑगस्ट, 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीमध्येही अनेक विजेत्यांना रक्कम भरता आली नाही. विजेत्यांची मागणीनुसार म्हाडा उपाध्यक्षांनी आपल्या अधिकारानुसार वाढीव मुदतीच्या तरतुदीनुसार 90 दिवसातं प्रचलित व्याज आकारणीनुसार सदनिकेची विक्री किंमत भरण्यास अंतिम मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार विजेत्यांना 16 जानेवारी, 2022 पर्यंत विक्री किंमत भरावी लागणार आहे.

हे ही वाचा - Omicron in Mumbai : मुंबईतील दोघांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग, राज्यातील रुग्णांची संख्या 10 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.