मुंबई - वडाळा येथील एका घरात पहाटे चारच्या सुमारास आग लागल्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. प्रतीक्षा नगरमधील इमारत क्रमांक १४मध्ये ही घटना घडली. घरातील दोन महिला आणि दोन मुले सुखरूप असल्याचे वृत्त आहे. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र त्यांना उशीर झाल्यामुळे संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
हेही वाचा - फोटो : ग्लोब सॉकर पुरस्कार 2020