ETV Bharat / city

ग्रंथालयाच्या सद्यस्थितीबाबत मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण; पुस्तकांचे होणार स्कॅनिंग! - मुंबई विद्यापीठ स्पष्टीकर ग्रंथालय पुस्तक

मुंबई विद्यापीठाने याबाबत एक निवेदन जाहीर करत ग्रंथालयातील जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच, अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रीया लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

books scanning mumbai university library
मुंबई विद्यापीठ स्पष्टीकर ग्रंथालय पुस्तक
author img

By

Published : Feb 22, 2022, 4:01 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे यांना वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुंबई विद्यापीठाला जाग आली आहे. मुंबई विद्यापीठाने याबाबत एक निवेदन जाहीर करत ग्रंथालयातील जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच, अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रीया लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा - BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

पुस्तकांचे होणार स्कॅनिंग -

जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही १९७५ ला तयार करण्यात आली होती. या ज्ञान स्त्रोत केंद्राची (विद्यापीठ ग्रंथालय) ग्रंथ संपदा ७ लाख ८० हजार एवढी आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिलेली होती. तसेच, काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. या ग्रंथालयातील अनेक पुस्तके ही जीर्ण आणि कालबाह्य झालेली आहेत. जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच, अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार आहे. उपयोगी नसलेली पुस्तके रद्दीमध्ये काढण्यासाठी गोणीत भरली असून रद्दीत विकण्याची प्रक्रीयाही सुरू आहे.

ग्रंथालयाचे पूर्ण क्षमतेने काम सुरू

या ग्रंथालय इमारतीचे बांधकाम जुने असल्याने कालपरत्वे या इमारतीचे आयुमान कमी झाल्याने विद्यापीठाने या इमारतीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट केले असून टप्प्या टप्प्याने कामे हाती घेण्यात आली आहेत. कामे प्रगतीपथावर आहेत. प्रथमतः ‘डी’ विंगचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून तळमजला व पोटमाळ्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, पहिल्या मजल्याचे काम मार्च २०२२ अखेरीस पूर्णत्वास येणार आहे. ‘डी’ विंग लगेचच पूर्ण क्षमतेमे सुरू केले जाणार आहे. त्यानंतर ‘सी’ विंगच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून तातडीने हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.

लवकरच ग्रंथालयासाठी नवी इमारत -

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर व प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी वेळोवेळी या ग्रंथालयाच्या इमारतीला भेटी देऊन कामाची पाहणी केली आहे. तसेच, विद्यापीठ अभियंता, संबंधित कंत्राटदारांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. टाळेबंदीच्या काळात दुरुस्तीच्या कामात थोडा खंड पडला होता, मात्र आता पूर्ण क्षमतेने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. विद्यानगरी परिसरात नवीन ग्रंथालय इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, काही किरकोळ कामे व ओसी प्राप्त होताच मार्च अखेरीस नवीन ग्रंथालयाची इमारत वापरासाठी खूली होणार आहे.

हेही वाचा - Mask Free Maharashtra : महाराष्ट्रात मास्क मुक्ती होणार..? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.